ETV Bharat / politics

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 'या' राज्यात कॉंग्रेसला भगदाड; माजी केंद्रीय मंत्र्यांसह डझनहून अधिक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Congress Leaders Joins BJP : राजस्थान काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत जयपूर येथील भाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह 30 हून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात कॉंग्रेसला भगदाड; माजी केंद्रीय मंत्र्यांसह डझनहून अधिक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 10, 2024, 2:18 PM IST

माजी केंद्रीय मंत्र्यांसह डझनहून अधिक नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश

जयपूर Congress Leaders Joins BJP : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची जोरात तयारी सुरू आहे. दरम्यान, बड्या नेत्यांची पक्ष बदलण्याचं सत्र सुरु आहे. या मालिकेत राजस्थान काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जयपूर येथील भाजपा मुख्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात तीन माजी मंत्र्यांसह अर्धा डझनहून अधिक काँग्रेस नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपा नेते भूपेंद्र यादव, उपमुख्यमंत्री दिया कुमारी आणि राजेंद्र राठोड उपस्थित होते.

दिग्गजांचा भाजपामध्ये प्रवेश : यामध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री लालचंद कटारिया, माजी गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांचा समावेश आहे. नागौरचे प्रमुख जाट नेते आणि माजी आमदार रिचपाल मिर्धा, विजयपाल मिर्धा यांचाही समावेश आहे. भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री खिलाडी लाल बैरवा यांचाही समावेश आहे. कमला बेनिवाल यांचा मुलगा आणि माजी आमदार आलोक बेनिवाल, भिलवाडा येथील काँग्रेसचे उमेदवार रामपाल शर्मा, रिजू झुंझुवाला यासारख्या मोठ्या नावांनीही आज काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केलाय.

हे नेते भाजपात : माजी केंद्रीय मंत्री लालचंद कटारिया यांच्यासह 32 काँग्रेस नेत्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. कटारिया यांच्यासह राजेंद्र यादव, रिचपाल मिर्धा, खिलाडी लाल बैरवा, आलोक बेनिवाल, विजयपाल मिर्धा, रामपाल शर्मा, रामनारायण किसन, अनिल व्यास, ओंकार सिंह चौधरी, गोपाल राम कुकना, अशोक जांगीड, प्रिया मेघवाल, सुरेश चौधरी आदी नेत्यांचा समावेश होता. राजेंद्र पर्सवाल, शैतान सिंग मेहरा, रामनारायण झाझरा, जगन्नाथ बुरडक, कर्मवीर चौधरी, कुलदीप देवा, बच्चू सिंग चौधरी, रामलाल मीना, महेश शर्मा, रणजित सिंग आणि मधुसूदन शर्मा यांनीही कॉंग्रसची साथ सोडत भाजपाचा हात पकडलाय.

जाट राजकारणाला येणार नवं वळण : नागौर, मिर्धा येथील पारंपरिक काँग्रेस आणि दिग्गज जाट कुटुंबातील मिर्धा पिता-पुत्र एकत्र आल्यानंतर पश्चिम राजस्थानच्या राजकारणात मोठा बदल होणार आहे. तर लालचंद कटारिया यांचे जाण जयपूर काँग्रेससाठी मोठा धक्का आहे. याशिवाय बेनिवाल कुटुंबातील आलोक बेनिवाल यांचं आगमन आणि शेखावाटी येथील सेवादलाचे मुख्य संघटक सुरेश चौधरी यांचा भाजपामध्ये प्रवेश यामुळंही भाजपानं जाट राजकारणाबाबत आपला दृष्टिकोन बदलल्याचं दिसून येतं. मात्र, चुरुचे खासदार राहुल कासवान यांनी तिकीट रद्द झाल्यानंतर काँग्रेसशी संपर्क साधला असून त्यांना कॉंग्रसच्या तिकीटावर चुरुमधून निवडणूक लढवण्याची संधी मिळू शकते. अशा स्थितीत जाट राजकारणासंदर्भातील बदल शेखावाटीतही पाहायला मिळतात.

हेही वाचा :

  1. 'सरकारला निष्पक्ष निवडणुका नको आहेत'; अरुण गोयल यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेससह तृणमूल काँग्रेसची भाजपावर टीका
  2. "मुंबई मेट्रो, BKC, वांद्रे-वरळी सी लिंकसह अनेक कामं...."; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.