मुंबई Adv Yashomati Thakur : अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवारानं आपल्या प्रतिज्ञापत्रात एजाज लकडावाला आणि एका बारमालकाकडून पैसे कर्जाऊ घेतल्याचं दाखवलंय. मात्र, अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या लोकांकडून इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आणले कुठून असा सवाल काँग्रेसच्या माजी मंत्री आणि आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केलाय.
काय म्हणाल्या यशोमती ठाकूर? : लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपावासी झालेल्या अमरावती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एजाज लाकडावाला आणि एका बार मालकाकडून पैसे कर्जाऊ घेतल्याचं नमूद केलंय. ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहेत त्यांचे कोणाशी संबंध आहेत हे जगजाहीर आहे. त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कुठून येतो, हे आता स्पष्ट झालंय. अशा अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तीला जनता निश्चित नाकारणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठ्या फरकानं विजय होईल, असा दावा ॲड. ठाकूर यांनी केला. तर राज्यातही महाविकास आघाडीला अतिशय चांगला प्रतिसाद असून जास्तीत जास्त जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात आल्या तर आश्चर्य वाटायला नको, असंही ॲड. यशोमती ठाकूर यावेळी म्हणाल्या.
महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार : अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना समाजातील सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो आहे. बळवंत वानखडे हे प्रचंड मतांनी विजयी होणार हे जवळपास स्पष्ट झालंय. वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षांसह अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार वानखडे यांना जाहीर पाठिंबाही दर्शवलाय. त्यामुळं आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून सर्व प्रकारे ते मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ॲड. यशोमती ठाकूर यांनी केलाय.
हेही वाचा :
- अमरावतीत संजय राऊतांविरोधात भाजपा महिला आघाडी आक्रमक; नवनीत राणांविरोधात अपशब्द वापरल्याचा रोष - Sanjay Raut Criticized Navneet Rana
- महाविकास आघाडीच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांना महत्त्व देणार : बळवंत वानखडे - Balwant Wankhade Announcement
- नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाषणातच म्हणाले... - Navneet Rana