ETV Bharat / politics

लोणावळ्यात काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर सुरू; पक्षाचे दिग्गज नेते करणार मार्गदर्शन - revanth reddy

Congress Camp in Lonavala : आजपासून पुण्यातील लोणावळा इथं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर सुरु झालंय. या शिबिरात काँग्रेसचे दिग्गज नेते मार्गदर्शन करणार आहेत.

Congress Camp in Lonavala
Congress Camp in Lonavala
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 12:32 PM IST

लोणावळा Congress Camp in Lonavala : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर आजपासून लोणावळा इथं आयोजित करण्यात आलय. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या शिबिरात महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्यासह प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.

पक्षाच्या आजी माजी आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश : लोणावळ्यात होणाऱ्या या शिबिराला पक्षाच्या सर्व आजी, माजी आमदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आलय. शिबिराच्या आदल्या दिवशी सायंकाळी सर्व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. काही कारणामुळं पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या आमदारांना आज मात्र उपस्थित रहावं लागणार असल्याचं सांगण्यात आलंय. आज जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रभारी यांची बैठक झाल्यानंतर दुपारी 2 वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येईल. त्यानंतर मान्यवरांचं स्वागत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं स्वागतपर भाषण होणार आहे.

ध्वजारोहणानं शिबिराला सुरुवात : दरम्यान आज सकाळी ध्वजारोहण करुन या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. शिबिराच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराव मोघे असणार आहेत. पहिल्या सत्रात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात व माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे हे नेते मार्गदर्शन करणार आहेत. तर दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान असतील या सत्रात सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी व वरिष्ठ पत्रकार निरंजन टकले व राजू परुळेकर मार्गदर्शन करतील.

हेही वाचा :

  1. काँग्रेस विधिमंडळ बैठकीला सहा आमदार गैरहजर: 'ते' आमदार भाजपाच्या संपर्कात?
  2. महाराष्ट्रातून स्थानिक नेत्याला राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसवर दबाव?
  3. मी काँग्रेससोबत आहे, काँग्रेससोबतच राहणार; मला पक्षाकडून फारशा अपेक्षा नाहीत - विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.