मुंबई CM and DCM Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा सुमारे दीड तास बैठक चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही उपस्थित होते. राज्यात गुरुवारी (25 जुलै) झालेला मुसळधार पाऊस आणि पुरामुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे बैठकीमागचं कारण ? : राज्यात गुरुवारी अनेक भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळं गंभीर परिस्थिती निर्माण झाली. राज्यातील याच आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रात्री उशिरा महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, दीड तास चाललेली ही बैठक रात्री दोनच्या सुमारास संपली.
पुण्यातील पाणी ओसरण्यास सुरुवात : गुरुवारी राज्यात निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुणे, कोल्हापूर, रायगड या भागात जवानांसोबतच एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलही बचाव कार्यासाठी अलर्ट ठेवण्यात आलं होतं. पुण्यातील नागरिकांना एअरलिफ्टनं सुरक्षितपणे बाहेर काढलं गेलं. आज सकाळपर्यंत पुण्यातील पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून, अद्यापही काही भागात पाण्याचा पूर्ण निचरा झालेला नाही. पुण्याला बसलेला पुराचा तडाका आणि एकूणच राज्यातील पावसाची स्थिती यावर रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाबाबतही चर्चा झाल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.
हेही वाचा -
- "भाजपाचा क्लिपचा कारखाना असून तेच..."-संजय राऊत - Sanjay Raut News
- राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले; कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा, प्रशासन हाय अलर्टवर - Kolhapur Floods
- साताऱ्यातील वाईमध्ये महिला गेली ओढ्याच्या पुरात वाहून, जिल्ह्यातील पर्यटनस्थळे तात्पुरती बंद - Heavy Rainfall in Maharashtra