मुंबई Chandrashekhar Bawankule : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर (Vidhan Sabha Election) पुन्हा 'डबल इंजिन सरकार' (Double Engine) येणार असं वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका सहन करावा लागला असला तरी, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडी घेईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. ते मुंबईत बोलत होते.
लहान भावांना सांभाळून घ्यायची भूमिका : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार, अमोल मिटकरी यांनी जागावाटपा संदर्भामध्ये बेताल वक्तव्य करत विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा केली आहे. अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी महायुतीत सर्व घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना समज देणं गरजेचं असल्याचं म्हटलंय. महायुतीत जागा वाटपाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेते निर्णय घेतील. आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत असलो तरी लहान भावांना सांभाळून घ्यायची आमची भूमिका राहिली आहे. मात्र, कोणाला किती आणि कुठल्या जागा द्यायच्या याबाबत निर्णय सर्वस्वी महायुतीचे वरिष्ठ नेते घेतील. या कारणानं याबाबत कुठल्याही कार्यकर्त्याने, नेत्याने विनाकारण माध्यमांसमोर अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये असंही बावनकुळे म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तार लवकर व्हायला पाहिजे : मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आहे. मंत्रिमंडळ विस्तार हा व्हायला पाहिजे. तसंच तो लवकर व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. परंतु याबाबत आम्हाला कितीही वाटत असलं तरी सुद्धा महत्त्वाचा निर्णय हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच घेतील.
हेही वाचा -
- उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन - उद्धव ठाकरे - Maharashtra assembly session
- अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यानं महायुतीत मिठाचा खडा; अमोल मिटकरी यांचा बोलविता धनी कोण? - Dispute in Mahayuti
- नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उत्स्फूर्त प्रतिसाद; 21 उमेदवार रिंगणात... - Nashik Teacher constituency