ETV Bharat / politics

"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉल आला अन्..."; हरिभाऊ बागडेंची राज्यपालपदी नियुक्ती झाल्यावर पहिली प्रतिक्रिया - Haribhau Bagade New Governor

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 5:15 PM IST

Updated : Jul 28, 2024, 6:28 PM IST

Haribhau Bagade New Governor : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात सहा राज्यामध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'हरिभाऊ बागडे' (Haribhau Bagade) यांची राज्यस्थानच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर बागडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Haribhau Bagade
राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे (ETV BHARAT Reporter)

छत्रपती संभाजीनगर Haribhau Bagade New Governor : माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते 'हरिभाऊ बागडे' (Haribhau Bagade) यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संघातील एकनिष्ठ कार्यकर्ते अशी त्यांची ओळख आहे. आतापर्यंत पाचवेळा ते आमदार म्हणून निवडणूक जिंकले असून ते सध्या फुलंब्री मतदार संघाचे आमदार आहेत. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी 5 वर्षे विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पूर्ण केला. त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्ती केल्यानं जुन्या एकनिष्ठ ज्येष्ठ कार्यकर्त्याचा सन्मान केल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. तर मला दिलेली जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन असं मत, हरिभाऊ बागडे यांनी यावेळी व्यक्त केलं.

प्रतिक्रिया देताना राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे (ETV BHARAT Reporter)

पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी कामाला सुरुवात : हरिभाऊ बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1944 रोजी झाला. 1985 मध्ये औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 1995 मध्ये युतीसरकारमध्ये ते रोहयो मंत्री होते. 2004 आणि 2009 मध्ये मात्र, त्यांचा फुलंब्री विधानसभा मतदार संघातून पराभव झाला होता. 2014 आणि 2019 असे सलग दोनवेळा त्यांनी विजय मिळवला. 2014 मध्ये युतीसरकार स्थापन झाले असताना, ते विधानसभेचे अध्यक्ष झाले. जवळपास पन्नास वर्षांपूर्वी हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांसाठी जोड धंदा असावा याकरिता शेतीपुरक असा दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकरांना प्रेरित केले होते. दूध संघाच्या माध्यमातून त्यांनी मोठा सहभाग दिला. तर पंडित दीनदयाल शिक्षण संस्थामार्फत शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं. स्वतःची संस्था असूनही कुटुंबातील एकही सदस्य संचालक मंडळावर नाही तर, एकही जमीन स्वतःच्या नावावर ठेवली नाही. संघ आणि भाजपासोबत एकनिष्ठ राहून तत्व न सोडता काम केल्यानं त्यांना सन्मान मिळाला. या निवडीनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र जल्लोष साजरा केला.

शनिवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः फोन केला होता. आधी त्यांनी विचारपूस केली .तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन जात आहोत असं पंतप्रधान मोदी त्यांनी सांगितलं. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पत्र काढून नियुक्ती करण्यात आली. एवढ्या लवकर हा निर्णय होईल असं वाटलं नव्हतं. तर आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष अशी अनेक पद भूषवल्यानं राज्यपाल म्हणून काम करताना मला कुठलीही अडचण येणार नाही. भारतीय जनता पक्षाने दिलेली जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडेन. - हरिभाऊ बागडे, नवनियुक्त राज्यपाल (राजस्थान)

जबाबदारी पार पाडेन : 1969-72 जनसंघाचा पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. 1980 पासून भाजपामध्ये काम करत आहे. मी आतापर्यंत पक्षाला कोणतीही गोष्ट मागितली नाही मला सर्व पक्षानेच दिल्याचं बागडे यांनी सांगितलं. 1985 मध्ये मला अचानक विधानसभा तिकीट जाहीर झालं. मंत्री पदाच्यावेळी देखील प्रमोद महाजन यांनी फोन केला तेव्हा मला सांगितलं शपथ घ्यायला यायचं आहे. त्यावेळी देखील मी इच्छा व्यक्त केली नव्हती. विधानसभा अध्यक्षच्यावेळी मला वाटलं होतं की, मला मंत्री करतील पण देवेंद्रजी यांनी मला विधानसभेचे अध्यक्ष केलं. मला राज्यपाल बनवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची शिफारस असावी. पार्टीत काम करत राहणं हेच माझं ध्येय आहे. पार्टीप्रति काम करत असल्यानं पार्टीने आणि नरेंद्र मोदी यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे आणि ती मी योग्य प्रकारे पार पाडेन, असं हरिभाऊ बागडे यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. ठरलं तर मग! विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 46 प्रभारी आणि 93 विधानसभा निरीक्षकांच्या नियुक्ती जाहीर - Vidhan Sabha Election
  2. महायुतीला का हवेत राज ठाकरे? 'मनसे'च्या इंजिनला स्पीड आलाय की महायुतीत घोळ झालाय? - MNS Mahayuti Assembly Elections
  3. विधानसभेची 'मत'पेरणी! 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ'नंतर आता बळीराजासाठी आणली 'ही' योजना - CM Baliraja Free Power Scheme

Last Updated : Jul 28, 2024, 6:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.