अमरावती Ram Kite Festival In Amravati : अयोध्येत २२ जून रोजी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर त्यानंतर इतर भाविकांना दर्शन घेता येणार आहे. राम मंदिराच्या भव्य कार्यक्रमासाठी देश सज्ज झालाय. अनेक ठिकाणी उत्साहाच वातावरण आहे. तर अयोध्येत भव्य मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार असल्याचा आनंद, भाजपाच्या वतीनं श्रीराम पतंग महोत्सवाद्वारे साजरा करण्यात आलाय. दहा बाय दहा फूट उंचीची पतंग भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सायन्सकोर मैदानावर उडवली. प्रभू श्रीरामासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र या भव्य पतंगीवर छापण्यात आले होते.
लहान मुलांना वितरित केल्या पतंग : भाजपाच्या या पतंग महोत्सवामध्ये भगव्या रंगाचा पतंग शेकडो चिमुकल्यांना वितरित करण्यात आला होता. पतंगी सोबतच चक्री आणि धागा देखील लहान मुलांना दिल्यामुळं मुलांनी पतंग उडवून आपला आनंद व्यक्त केला. या लहान मुलांसोबतच त्यांच्या पालकांनी देखील पतंग उडवण्याचा आनंद यावेळी घेतला.
22 जानेवारीला अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. प्रभू श्रीराम यांची अयोध्येतील भव्य मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. जगभरातील सर्व हिंदूंसाठी हा आनंदाचा क्षण आहे. या पतंग उत्सवात अनेक चिमुकले सहभागी झाले होते. मुलांना जो आनंद झाला आहे तोच आनंद प्रत्येक हिंदूला होत आहे - अनिल बोंडे, खासदार
भाजप पदाधिकाऱ्यांचा सहभाग : भाजपचे माजी शहरप्रमुख किरण पातुरकर यांच्यावतीनं आयोजित श्रीराम पतंग महोत्सवांमध्ये खासदार अनिल बंडे यांच्यासह भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी, प्राध्यापक रवींद्र खांडेकर, रविराज देशमुख, राम जोशी, चंद्रकांत डोरले माजी नगरसेवक सुरेखा लुंगारे, नूतन भुजाडे, गंगा खारकर आदी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थित मानवरांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
हेही वाचा -