ETV Bharat / politics

महाराष्ट्रात भाजपाच्या सुमार कामगिरीचे साईड इफेक्ट्स; संघटनात्मक फेरबदलाची दाट शक्यता - BJP in Maharashtra - BJP IN MAHARASHTRA

BJP in Maharashtra : लोकसभा निवडणुकांमध्ये अपेक्षेप्रमाणं जागा न मिळाल्यानं अनेक नेत्यांच्या पक्षातील अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अपयशाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमरावतीत माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत सुरू असलेल्या संघर्षाला वादाची फोडणी दिल्यानं भारतीय जनता पार्टीत सारं आलबेल नसल्याचं चित्र आहे.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat MH desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 5:44 PM IST

नागपूर BJP in Maharashtra : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत '४५ प्लस' चा दम भरणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सुमार कामगिरीने अनेक नेत्यांच्या पक्षातील अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत अपयशाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. तर दुसरीकडे अमरावतीत माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षांतर्गत सुरू असलेल्या धुसपुसीला वादाची फोडणी दिल्याने भारतीय जनता पार्टीत सारं आलबेल नसल्याचं चित्र आहे. मोदी सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अनेकांच्या पदांवर गदा येणार आहेत. यामध्ये स्थानिक आणि राज्य स्तरावरील नेत्यांचा समावेश आहे त्यामुळे भाजपा नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, प्रांताध्यक्ष आणि राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना ९ जूनला दिल्लीत बोलावण्यात आलं आहे.

जितेंद्र (बंटी) कुकडे, शहराध्यक्ष, भाजपा नागपूर (ETV Bharat Reporter)

नेत्यांच्या कामांचं होणार मुल्यमापन : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात मानहानीकारक पराभव पत्करावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर घेत मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा प्रकट केल्यानंतर आता जिल्हा पातळीवरही लोकसभा निवडणुकीत नेत्यांच्या कामाचे मूल्यमापन होणार आहे. त्यानुसार नेते आणि कार्यकर्त्यांवर जबाबदारी द्यावी किंवा काढून घेण्यात यावी, यासंदर्भात निर्णय होणार आहेत.

पक्षावर आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अति-सुमार कामगिरीमुळे नेत्यांची झाडाझडती होणार आहे. मात्र,त्यापूर्वीच अनेक नेते हे स्वतःहून पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. अमरावतीत प्रवीण पोटे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिल्याने या शक्यतांना अधिक बळ मिळालं आहे. मात्र, एवढ्याने पक्षावर आलेली मरगळ दूर होणार नाही, तर आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र काबीज करायचा असल्याने भाजपा पक्षश्रेष्ठी 'ॲक्शन मोड' वर येतील आणि संघटनेत मोठे फेरबदल केले जातील अशी शक्यता नाकारता येत नाही.

निकालानंतर नागपुरात पहिली विकेट डाऊन : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण सुरू झालं आहे. विधानसभानिहाय विश्लेषण केलं जात आहे. त्यानुसार भाजपा आमदारांच्या मतदारसंघातचं महायुतीच्या उमेदवाराला कमी पडलेलं मतदान ही भाजपासाठी चिंतेची बाब आहे. नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रातून भाजपाचे आमदार टेकचंद सावरकर हे निवडून येतात तिथेच महायुतीच्या उमेदवाराला सर्वात मोठा फटका आहे. याची दखल घेत कामठी शहर मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांच्याकडून तत्काळ प्रभावाने पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आणि सर्वच कार्यकारणी देखील बरखास्त करण्यात आली. त्याचप्रमाणे येत्या काळात राज्यातही झाडाझडतीला सुरुवात होईल आणि मोठ्या प्रमाणात खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपा आणि संघात संवाद : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निराशाजनक कामगिरीची जबाबदारी घेत मंत्रिपदाच्या राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) ॲक्शनमध्ये आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा राजीनामा देऊ नये असा सूर संघात उमटू लागला आहे.

भाजपा नेत्यांची वायफळ बडबड, संघ नाराज : भारतीय जनता पार्टी ही आता स्वयंपूर्ण झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज लागत नसल्याचं मत भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना व्यक्त केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही भाजपा नेत्यांच्या वायफळ बडबडीमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक प्रचंड नाराज झाले. स्वयंसेवकांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली नसली तरी या बाबतीत संघ 'दक्ष' आहे, हे निश्चित. त्यामुळे भाजपामध्ये होऊ घातलेले संघटनात्मक बदल हा नाराजीनाट्याचा केवळ पूर्वार्ध आहे. उत्तरार्धात राज्य सरकारमध्ये याचं प्रतिबिंब दिसण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. विदर्भात महायुतीचं अपयश कशामुळं? काय असतील कारणं? वाचा... - LOKSABHA ELECTIONs 2024
  2. १० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी - NDA gov formation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.