ETV Bharat / politics

जरांगे राजकीय भूमिका मांडाल तर खबरदार; आशिष शेलार यांचा थेट इशारा - Ashish Shelar On Jarange Patil - ASHISH SHELAR ON JARANGE PATIL

Ashish Shelar On Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलं आहे. तर जरांगेंच्या आरोपाला आता आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Ashish Shelar On Jarange Patil
आशिष शेलार आणि जरांगे पाटील (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 7:45 PM IST

मुंबई Ashish Shelar On Jarange Patil : मराठा नेते, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सातत्याने भाजपा तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका करत आहेत. त्यांच्या टीकेला भाजपाकडून सातत्यानं उत्तर दिलं जात असलं तरी त्या उत्तरालासुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रतिउत्तर दिलं जात आहे. आता मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांनी टोकाची भूमिका घेत जरांगे पाटील यांना थेट शब्दात धमकावलं आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या हिताची भूमिका तुम्ही मांडत आहात तोपर्यंत तुमचं स्वागत आहे. परंतु त्यामध्ये राजकीय भूमिका मांडाल तर त्याला सडेतोड उत्तर दिलं जाईल, असं शेलार म्हणाले आहेत. ते मुंबईत बोलत होते.

प्रतिक्रिया देताना आशिष शेलार (ETV BHARAT Reporter)

राजकीय भूमिका मांडाल तर सडेतोड उत्तर देऊ : जरांगे पाटील तुम्ही एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पक्षाला संपवण्याची भूमिका ज्या ज्या लोकांनी घेतली, त्या लोकांच्याबद्दल थोडा अभ्यास करा, आम्ही समाजाबरोबरच आहोत आणि समाज आमच्या बरोबर आहे. पण तुमच्यासोबत सकल मराठा समाज आहे या गैरसमजात तुम्ही राहू नका आणि जर का तुम्ही निवडणुकीची भाषा बोलत असाल तर आम्ही तयार आहोत. आम्ही अशा बऱ्याच निवडणुकांमध्ये पराभवही पचवले आणि विजयसुद्धा मिळवले. त्यामुळं तुम्ही निवडणुकीची भाषा आम्हाला शिकवू नये. तुम्ही जोपर्यंत समाजाची भूमिका मांडताय तोपर्यंत तुमचं स्वागत आहे आणि राजकीय भूमिका मांडत असाल तर सडेतोड उत्तर देऊ, अशा शब्दात आशिष शेलार यांनी जरांगे पाटील यांना ठणकावलं आहे.

जरांगे पाटील यांना काही गोष्टींचा विसर पडला आहे : ज्यांनी मराठा समाजाला कधी आरक्षण दिलं नाही, किंबहुना ज्यांनी मिळालेले आरक्षण सुद्धा घालवले, त्यांच्या विरोधात जरांगे पाटील कधीच चकार शब्द काढत नाहीत. उलट ज्यांनी दिलं त्यांच्या विरोधातच जरांगे पाटील का बोलत आहेत? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणं महाराष्ट्रात सतत हिंदूंच्या बाजूनं बोलणाऱ्या भाजपाला संपवण्याचं मोठं कारस्थान रचलं जात आहे. मराठा समाजाच्या मागणीला भारतीय जनता पक्षाचं संपूर्ण समर्थन दिलं असून किंबहुना मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका विरोधी पक्षाने फक्त भाषणात मांडली, त्याचं कायद्यात रुपांतर करण्याचं महत्त्वाचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाने केलं आहे. जरांगे पाटील यांना त्‍याचा विसर पडला आहे का? असा सवालही शेलार यांनी केला आहे.

हेही वाचा -

  1. दरेकर जरांगेंचा कलगी तुरा; जरांगे म्हणतात, 'कपाळावर कुंकू लावले तर ते...', तर दरेकर म्हणतात 'जरांगेंच्या नौटंकीला मराठा समाज भुलणार नाही'
  2. मनोज जरांगे पाटलांविरोधात अटक वॉरंट जारी; काय आहे नेमकी भानगड? - Manoj Jarange Patil
  3. देवेंद्र फडणवीस माझ्या विरोधात अभियान राबवत आहेत: मनोज जरांगेंचा पुन्हा हल्लाबोल - Manoj Jarange On Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.