ETV Bharat / politics

'शरद पवार निखारा, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'; खासदार अमोल कोल्हे - Amol Kolhe - AMOL KOLHE

Amol Kolhe : महात्मा फुले जयंतीनिमित्त फुले वाड्यामध्ये अमोल कोल्हे यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि रवींद्र धंगेकर यांच्यासोबत महात्मा फुलेंना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Amol Kolhe
'शरद पवार निखारा, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है'; खासदार अमोल कोल्हे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 1:21 PM IST

खासदार अमोल कोल्हे

पुणे Amol Kolhe : 'शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील निखारा आहेत. त्या निखाऱ्याचा करिष्मा प्रत्येकाच्या मनावर गारुड करणारा आहे. आम्ही फक्त त्यावरची राख दूर करण्याचा प्रयत्न करत असून हा तर सगळा ट्रेलर आहे, चित्रपट बाकी असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे यांनी आज पुण्यात दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होणाऱ्या पक्ष प्रवेशाबाबत ते बोलत होते.

हा ट्रेलर आहे : यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, "शरद पवारांच्या कर्तृत्वाचं गारुड महाराष्ट्रभर एवढं मोठं आहे, हा फक्त ट्रेलर आहे. पिक्चर आणखी बाकी आहेत. शरद पवार साहेबांच्या मागं संपूर्ण महाराष्ट्र एकवटलाय. एकापाठोपाठ एक प्रत्येक जण आपली भूमिका मांडतोय प्रत्येकाला ते पटतय त्यामुळं हे पक्ष प्रवेश होत आहेत." शिरुर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यापूर्वी अमोल कोल्हे यांनी निलेश लंके यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांचा पक्षप्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी मोहिते पाटलांची भेट घेतली त्यांचाही पक्षप्रवेश निश्चित झालेला आहे. त्यामुळं हा सगळा ट्रेलर आहे, पिक्चर आणखी बाकी असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी आज दिली.

आढळराव पाटलांना टोला : पाच वर्षात पाच पक्ष बदलणारा देशातील एकमेव आमचा शिरुर मतदार संघ आहे. त्यामुळं मतदारसंघ बदनाम झाल्याची टीका अमोल कोल्हे यांच्यावर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली होती. त्यावर सुद्धा अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलीय. ते म्हणाले, "मला वाटतं त्यांच्यासमोर कदाचित आरसा असेल. मी त्यांना एवढ्या शुभेच्छा देईन 'गेट वेल सून'. कदाचित हे महोदय कांदा निर्यात बंदी बद्दल बोलताना दिसले असते, दूध उत्पादक शेतकऱ्यांविषयी बोलताना दिसले असते तर मला दिलासा वाटला असता. त्यामुळं विनाकारण खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची ही टीका केली जात आहे. त्यांचं वय पाहता बरे व्हा एवढंच मी त्यांना सांगतो."

हेही वाचा :

  1. पश्चिम महाराष्ट्रातील 'या' मोठ्या नेत्याचा होणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेश, उद्या शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम - Lok Sabha Election
  2. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, 'या' दोन जागांवर उमेदवार घोषित, एका जागेचा तिढा कायम - NCP SCP Candidate List

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.