छत्रपती संभाजीनगर Imtiaz Jaleel on Navneet Rana : भाजपा उमेदवार नवनीत राणा आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरुच आहे. माझ्या नजरेची अतिशय चीप दर्जाची महिला आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकते. दहा मिनिट टिव्हीवर दिसणार असं सांगितल्यावर ती काहीही करु शकते अशी टीका एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर केलीय. त्याचबरोबर दोन्ही शिवसेनेत जो काही प्रकार झाला, तो घडवून आणला होता का? पुढं बघा काही जणांच्या गाड्या फोडल्या तर आश्चर्य वाटायला नको असं देखील त्यांनी म्हटलंय.
नवनीत राणांना महत्त्व देऊ नका : नवनीत राणा यांच्यावर प्रश्न विचारण्यात आल्यावर तुम्ही या चिल्लर लोकांना एवढं महत्त्व का देता, माझ्या नजरेची अतिशय चीप दर्जाची महिला आहे. प्रसिद्धीसाठी कोणत्याही पातळीला जाऊ शकतो, पब्लिसिटी साठी मंदिरात न जाता उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा वाचायची म्हणत होती. दहा मिनिटं कॅमेरासमोर तुला दाखवतो असं म्हणाल्यास ती दहा मिनिटं एकटी नाचेल. तिला इथं बोलावलं म्हणजे भाजपाला कोणीतरी भूंकणार हवं. अमरावती वरुन हे पार्सल आणलंय आता त्यांची मेहफिल सजेल, अशी जहरी टीका इम्तियाज जलील यांनी नवनीत राणांवर केलीय.
यांचं भांडण रस्त्यावर पाहायचं राहिलं होतं : शिवसेनेचे दोन गट आपापसात भिडले त्यावर यांची लढाई रस्त्यावर पाहायची बाकी होती, ती माझी मनोकामना होती. मी विचार केला होता, रस्त्यावरील मारामारीचा तो यांनी पूर्ण केला. मात्र यांचं भांडण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर होतात. ही लढाई बॅलेटची नसून दांड्यांची आहे. आणखी दोन दिवसानंतर पहा काय काय होतं, कुणा कोणाची ऑफिस फुटतात, कुणाकुणाच्या गाड्या फुटतात यांची सर्व तयारी आहे. विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी हातात दारुच्या बाटल्या घेऊन घोषणाबाजी केली. तुम्ही दारुचं दुकान उघडलं म्हणून दारुच्या बाटल्या दाखवल्या. निवडणुकीच चिन्ह दारुच्या बाटल्या ठेवायला पाहिजे होतं, अशी टीका जलील यांनी महायुती उमेदवार संदीपान भुमरे यांच्यावर केली. मनसे कार्यकर्ते शिंदे गटाच्या प्रचाराला दोनशे दोनशे रुपयांमध्ये आले होते हे मलाही माहित आहे, बिचारे दोनशे रुपये घेऊन प्रचाराला येणाऱ्या लोकांना दोनशे रुपयात घोषणा द्यायची म्हणून आणलं होतं. मात्र, त्यांना हे माहीत नव्हते की दोनशे रुपये दंड पण खावे लागतील, अशी टीका जलील यांनी केलीय.
हेही वाचा :