ETV Bharat / politics

'त्या' प्रकरणानंतर गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात? लवकरच होणार निर्णय - सोमवारी होणार निर्णय

Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. आता या प्रकरणानंतर गायकवाड यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा आहे.

After the firing on Mahesh Gaikwad Ganpat Gaikwad stay MLA or not decision to be made soon
गणपत गायकवाड यांची आमदारकी धोक्यात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 6:17 PM IST

मुंबई Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरचे भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबार प्रकरणानंतर आता त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे. त्यांच्या आमदारकीबाबत सोमवारी निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विधिमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विधिमंडळाला कळवली गुन्ह्याची माहिती : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती ठाणे पोलिसांकडून विधिमंडळाला कळविण्यात आली आहे, अशी माहिती कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी दिली. यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले की, विधानभवन सचिवालयाचा यासंदर्भातील एक नमुना असतो. या नमुन्यामध्ये गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराची पूर्ण माहिती देण्यात आली आहे. याबाबतचा ई-मेल आम्ही विधानभवन सचिवालयाला पाठवला आहे. तसंच गणपत गायकवाड हे आमदार असल्यानं त्यांच्यावरील कारवाईबाबतची माहिती आम्हाला ताबडतोब विधान भवनाला ई-मेल द्वारे कळवावी लागली. त्याप्रमाणे विहित नमुन्यात आम्ही ती माहिती विधिमंडळाला कळवली आहे. पुढील कार्यवाही ही विधिमंडळाकडून करण्यात येते, असंही शिंदे म्हणाले.

सोमवारी होणार निर्णय : एखाद्या आमदाराकडून गुन्हा घडल्यास त्याबाबतची माहिती ही विधिमंडळाला आणि विधानसभा अध्यक्षांना तातडीनं द्यावी लागते. आमदारावरील कारवाईसाठी विधान भवनाची अथवा विधानसभा अध्यक्षांची परवानगी महत्त्वाची असते. त्यानुसार ही माहिती पाठवण्यात आली आहे. परंतु विधानमंडळाला दोन दिवस सुट्टी असल्यानं आता सोमवारी विधानसभा अध्यक्ष या प्रकरणाची माहिती घेऊन त्यावर निर्णय घेतील, असं विधिमंडळ सचिवालयातील अधिकाऱ्यांनी सांगितलंय.

काय आहे प्रकरण : भाजपा आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांची हिल लाइन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शुक्रवारी चर्चा सुरू होती. यावेळी गणपत गायकवाड समर्थक आणि महेश गायकवाड समर्थक यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यावेळी काही कळायच्या आत या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद सुरू झाला तेव्हाच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर आता ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा -

  1. भाजपा आमदार गोळीबार प्रकरण; देवेंद्र फडणवीसांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
  2. उल्हासनगरमध्ये भाजपा आमदाराचा शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, आमदार अटकेत
  3. 'या सरकारला थोडी लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा'; नाना पटोले यांचा सरकारवर घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.