ETV Bharat / opinion

महिलांचे आरोग्य आणि रजोनिवृत्तीवर निरोगी चर्चेची आवश्यकता - Menopause

Debate on Menopause : आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी, प्रतिष्ठित मेडिकल नियतकालिक लॅन्सेटनं रजोनिवृत्तीवर उहापोह केलाय. यात ते या नैसर्गिक संक्रमणाला रोगामध्ये बदलण्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. एकूणच याबाबत दिल्लीस्थित आरोग्य रिपोर्टर तौफिक रशीद यांचा हा रिपोर्ट.

लिंग-आधारित वयवादाला आव्हान देण्यासाठी रजोनिवृत्तीवर निरोगी चर्चेची आवश्यकता : द लॅन्सेट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 4:48 PM IST

Debate on Menopause : बायोलॉजिकल एजिंग नावाची एक गोष्ट आहे. स्त्रियांसाठी सर्वात नैसर्गिक संक्रमण म्हणजे रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती म्हणजे तुमची मासिक पाळी संपल्याची खूण. सलग 12 महिने मासिक पाळी न आल्यावर त्याची पुष्टी केली जाऊ शकते. हे नैसर्गिक संक्रमण प्रत्येक स्त्रीच्या जीवनाचा भाग आहे. तथापि व्यावसायिक कंपन्या आणि तसे हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी रजोनिवृत्तीचा अतिरेक केलाय, असं लॅन्सेटच्या संपादकीयमध्ये लिहिलंय. या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकानं 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनापूर्वी प्रकाशित झालेल्या अंकात यावर प्रकाश टाकलाय. व्यावसायिक कंपन्या आणि हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी वैद्यकीय ढवळाढवळीमुळे रजोनिवृत्तीचं संक्रमण गुंतागुंतीचं होतं, असं यात लिहिलंय.

इस्ट्रोजेनच्या कमतरतेचा रोग म्हणून संक्रमणाच्या या नैसर्गिक कालावधीची रचना केल्यानं केवळ अशा संप्रेरकांच्या बदलामुळं रजोनिवृत्तीसाठी नकारात्मक वृत्ती निर्माण होते. या नियतकालिकात स्पष्ट केल्याप्रमाणे, स्त्रियांचा रजोनिवृत्तीचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलतो आहे. बऱ्याच स्त्रिया जीवनाच्या या अवस्थेत आपसूक संक्रमण करतात, तर काहींना दीर्घ किंवा गंभीर लक्षणं जाणवतात आणि त्यांना माहिती तसंच वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असते. तसंच प्रत्येकीच्या अनुभवाला कारणीभूत घटक केवळ वैयक्तिक घटक असू शकत नाहीत, तर त्यामध्ये मानसिकता आणि भवताल याचाही विचार करावा लागेल असं संशोधकांनी म्हटलंय.

लॅन्सेटच्या मते, रजोनिवृत्तीशी संबंधित सर्वात सामान्य लक्षणांमध्ये काही सर्वसाधारण लक्षणांचा समावेश होतो. जसं की चमक येणे आणि रात्री घाम फुटणं, झोपेचा त्रास, योनीमार्गात कोरडेपणा आणि स्नायू तसंच सांधेदुखी. रजोनिवृत्ती सामान्यतः खराब मानसिक आरोग्याशी संबंधित असल्याचं मानलं जातं. मात्र तसं नाही. रजोनिवृत्तीच्या वेळी सुरुवातीला होणाऱ्या क्लिनिकल नैराश्याचा धोका वाढला असल्याचा कोणताही सबळ पुरावा नाही. जरी पूर्वीच्या क्लिनिकल नैराश्यात असलेल्या लोकांमध्ये पुनरावृत्ती होण्याचा हा असुरक्षित कालावधी असू शकतो. या मालिकेतील एका शोधनिबंधात डॉक्टरांनी असा आग्रह धरलाय की, मानसिक त्रासाचं चुकीचं कारण आणि रजोनिवृत्तीची मानसिकता त्याचवेळी अचूक निदान आणि प्रभावी उपचार सुरु होण्यास विलंब, यातून स्त्रियांना हानी पोहोचवू शकते. संपादकीयामध्ये मेनोपॉजल हार्मोनल थेरपी (MHT) च्या विवेकपूर्ण वापरावर देखील भर दिलाय.

सुरुवातीच्या चमकेसारख्या लक्षणांसाठी काही प्रभावी उपचार आहेत. परंतु त्यामध्येही धोका आहे. या क्षेत्रातील अभ्यासातून मजबूत पुरावे असे सूचित करतात की ५० वर्षांच्या वयापासून सिस्टिमिक, एकत्रित MHT घेत असलेल्या प्रत्येक ५० महिलांना स्तनाच्या कर्करोगाची शक्यता असते. तर एस्ट्रोजेनचा केवळ ७० पैकी एका महिलेला त्रास होऊ शकतो. MHT ची विनंती करणाऱ्या सर्व स्त्रिया, त्यांच्या डॉक्टरांसोबत अल्प-मुदतीचे आणि दीर्घकालीन फायदे आणि जोखीम जाणून घेतल्यानंतर, त्यांना जोखीम असल्याशिवाय उपचार दिले जावेत असा तज्ञांचा आग्रह आहे. तथापि, प्रत्येक स्त्रीला याची गरज नसते. ''कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सारख्या उपचारांमुळे चमकेसारख्या लक्षणांचा सामना करण्यास आणि मूडस्विंग आणि झोपेची संभाव्यता सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.''

डॉक्टरांनी कंपन्यांच्या प्रचारकी माहितीवर अवलंबून राहू नये असं या संपादकीयामध्ये म्हटलं आहे. चिकित्सकांद्वारे निःपक्षपाती माहितीपर्यंत सुलभतेने देण्यावर जोर दिला आहे. महिला आणि आरोग्यावर अधिक संशोधनाच्या गरजेवर यात भर दिला आहे. महिलांच्या आरोग्याविषयी वाढलेली जागरूकता आणि वैद्यकशास्त्रातील दीर्घकाळ चालत आलेले लैंगिक पूर्वाग्रह दूर करण्याची गरजही आहे. रजोनिवृत्तीचं डॉक्टरी स्तोम माजवल्यानं रामबाण उपाय म्हणून MHT ची जाहिरात करणे उपयुक्त नाही. या संक्रमणाच्या व्यवस्थापनावर माहितीपूर्ण, वैयक्तिक निर्णय घेण्यास सक्षम करण्यासाठी रजोनिवृत्तीबद्दल समजूतदारपणे बोलण्याची गरज आहे.

रजोनिवृत्तीबद्दल माहिती आणि शिक्षणाच्या कमतरतेमुळे माहिती नसलेल्या आरोग्य-सेवा माथी मारल्या जातात. कामाच्या ठिकाणीही समजूतदारपणाचा अभाव दिसून येतो. लॅन्सेटच्या मते रजोनिवृत्तीतही महिला मजबूत, निरोगी असू शकतात. त्या आनंदी राहू शकतात. त्यांच्यामते, स्त्रियांना आणि समाजाला एक वास्तववादी, संतुलित संदेश पाठवण्याची गरज आहे. रजोनिवृत्ती हा ऱ्हासाच्या कालावधीची सुरुवात करत नाही, तर विकासात्मक जीवनाचा टप्पा आहे.

आमच्या आजी, माता आणि काकूंना रजोनिवृत्ती झाली आहे, हे जीवनाचे सामान्य संक्रमण आहे आणि रजोनिवृत्तीची हार्मोनल थेरपी (MHT) ही फॅशन होऊ शकत नाही. प्रत्येक रजोनिवृत्तीच्या स्त्रीला याची आवश्यकता नसते. तर गरजेनुसार दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतील असे काहीतरी वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक आहे असं, डॉ. अमिता जैन, वरिष्ठ सल्लागार, मेदांता हॉस्पिटलच्या युरोगॅनेकोलॉजी सांगतात. रूग्णांना दीर्घ आणि अल्पकालीन परिणाम आणि साइड इफेक्ट्स देखील समजावून सांगितल्यानंतर डॉक्टर आवश्यकतेनुसार उपाय लिहून देऊ शकतात. रुग्णासाठी, थेरपी सुरू करणे हा एक माहितीपूर्ण निर्णय असणे आवश्यक आहे.

जगातील एक अब्ज स्त्रियाच्या निरीक्षणानंतर असं दिसून आलं आहे की, रजोनिवृत्ती सामान्यतः 50 ते 51 वयोगटातील महिलांसाठी सुरू होते. 2 ते 4 टक्के स्त्रीया 40 वर्षापूर्वी अकाली डिम्बग्रंथी अपुरेपणा अनुभवतात. 8 ते 10 टक्के महिलांना 40 ते 44 वर्षे वयात अर्थात लवकर रजोनिवृत्तीचा अनुभव येतो. याचची लक्षणे पाहता दीर्घकाळापर्यंत रक्तस्त्राव, चमक, रात्री घाम येणे, झोप न लागणे, सांधेदुखी आणि जडपणा आणि योनीतील कोरडेपणा अशी दिसून येतात. लक्षणे पाहून मेनोपॉझल हार्मोनल थेरपीने उपचार केले जाऊ शकतात. रजोनिवृत्तीनंतर लैंगिक क्रिया प्रभावित होतात हे एक मिथक आहे. रजोनिवृत्तीनंतर नियमित तपासणीसाठीची गरज असते. व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची पातळी तपासावी लागते. पुरेशी विश्रांती आणि चांगला आहार महत्त्वाचा असतो. लॅन्सेटच्या मते उपचारांबाबत निर्णय हा योग्य सल्ला आणि आवश्यकतेनुसार घेणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.