काठमांडू- नेपाळमध्ये आज सकाळी काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण अपघात झाला. 19 जणांना घेऊन जाणारे विमान विमानतळावर कोसळले. वैमानिकाला रुग्णालयात नेण्यात आले आहे. विमानतळावर तैनात असलेल्या एका सुरक्षा अधिकाऱ्यानं ही माहिती दिली.
काठमांडू विमानतळावरून उड्डाण करताना विमान धावपट्टीवरून घसरल्यानं विमान कोसळले. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, विमान काठमांडूहून पोखराकडे रवाना होणार होते. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी ही माहिती दिली. विमान उड्डाणावेळी त्यात फक्त तांत्रिक कर्मचारीच होते.
#WATCH | Plane crashes at the Tribhuvan International Airport in Nepal's Kathmandu
— ANI (@ANI) July 24, 2024
Details awaited pic.twitter.com/DNXHSvZxCz
- वैमानिकाचे वाचले प्राण- सध्या अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. नेपाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील कॅप्टन मनीष शाक्य यांना उपचारासाठी सिनामंगल येथील केएमसी रुग्णालयात नेण्यात आलं.
विमान अपघाताचा व्हिडिओ आला समोर- नेपाळ सरकारच्या एका हँडलवरून विमान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये विमान अपघातानंतर इमारतीजवळून धूर निघाल्याचं दिसत आहे.
Press Release -1 pic.twitter.com/CJshytY9P7
— TIA,Kathmandu (@TIACAO2) July 24, 2024
नेपाळमध्ये सातत्यानं होतात भीषण अपघात
- काठमांडू शहरातील विमानाच्या धावपट्टी सर्वात कठीण मानल्या जातात. विमानतळाच्या दोन्ही बाजूंना बर्फाच्छादित शिखरे आहेत. त्यामुळे वैमानिकांना विमान उतरविताना सर्व कौशल्य पणाला लावावं लागतं. तसंच बदल्या वातावरणातही विमानांची उड्डाण घेणं अनेकदा धोकादायक असतं. नेपाळमध्ये जानेवारी 2023 पोखरा येथे विमान धावपट्टीवर उतरताना यती एअरलाइन्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात विमानातील सर्व 72 प्रवाशांचा मृत्यू झाला. 1992 मध्ये पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान कोसळल्यानंतर त्यातील सर्व 167 प्रवासी ठार झाले होते. हा नेपाळमधील सर्वात भीषण अपघात होता.
हेही वाचा-