ETV Bharat / international

अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प फेस टू फेस; काय आहे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'? - First Presidential Debate

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 7:40 AM IST

Updated : Jun 28, 2024, 7:54 AM IST

First Presidential Debate : अमेरिकेत निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक हे जनतेसोबत एका डिबेटच्या माध्यमातून आपले व्हिजन मांडत असतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे दोघेही वादविवादांच्या माध्यमातून अमेरिकन मतदारांवर छाप पाडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Etv Bharat
Etv जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प आमनेसामनेBharat (IANS)

वॉशिंग्टन डीसी First Presidential Debate : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) अध्यक्षीय वादविवादात सामील झाले. या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत सार्वत्रिक निवडणुका होता आहेत. त्या पार्श्वभूमीवर या डिबेटकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. अमेरिकेत निवडणुकांचा काळ जवळ आल्यानंतर अशा प्रकारचे डिबेट आजोजित केले जातात.

अमेरिकेत कधी आहेत निवडणुका? : अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीचा प्रचार आणि आपापले मुद्दे अमेरिकन जनतेसमोर ठेवण्याचे काम दोन्ही पक्ष करत आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे या निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत.

‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ म्हणजे काय? : अमेरिकेमध्ये द्विपक्षीय अध्यक्षीय लोकशाही आहे. तिथे निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी जाहीर वादविवाद करण्याची प्रथा आहे. याला ‘प्रेसिडेन्शियल डिबेट’ असे म्हणतात. सामान्यत: तीन प्रेसिडेन्शियल डिबेट्स केल्या जातात. त्यातील पहिला वादविवाद आज होत आहे. हा वादविवाद टेलिव्हिजनवर प्रसारित केला जातो. फक्त अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील माध्यमांना आणि राजकारण्यांना चर्चेसाठी नवनवे विषय यामुळं प्राप्त होतात.

पहिल्यांदाच विद्यमान आणि माजी राष्ट्राध्यक्ष फेस टू फेस : ट्रम्प आणि बिडेन हे 4 वर्षांनंतर आमनेसामने आले असले तरी यावेळची अध्यक्षीय चर्चा अनेक अर्थांनी वेगळी आहे. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी विद्यमान राष्ट्राध्यक्ष वादविवाद करण्याची ही पहिलीच वेळ असेल. बायडेन हे डेमोक्रॅटिक पक्षाचे तर ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आजपर्यंत दोन्ही पक्षांनी या नेत्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. ट्रम्प यांना जुलैमध्ये पक्षाकडून आणि ऑगस्टमध्ये बायडेन यांना पक्षाकडून चिन्ह मिळणार असल्याच्या बातम्या आहेत.

2020 नंतर दोघेही पुन्हा एकदा आमनेसामने : बायडेन आणि ट्रम्प हे दोघेही एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. ट्रम्प यांच्यावरील कथित गुन्ह्यांच्या बाबतीत बायडेन हे नेहमी हल्ला करत असल्याचं दिसून आलं. अमेरिकेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी पहिली अधिकृत चर्चा म्हणजेच अध्यक्षीय वादविवाद सुरू आहे. 2020 नंतर दोघेही पुन्हा एकदा आमनेसामने आले.

हेही वाचा - अमेरिका-पाकिस्तान संबंध: अमेरिकेच्या धोरणात कसा झाला बदल ? - Chapter On US Pakistan Relations

Last Updated : Jun 28, 2024, 7:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.