बगदाद : Us Iran War : अमेरिका आणि इराणमधील तणाव सर्वांनाचं ज्ञात आहे. हे दोन्ही देश कायम एकमेकांविरोधात आक्रमक झालेलं आपण पाहिलं आहे. आता इराण समर्थित दहशतवाद्यांनी शनिवारी पश्चिम इराकमधील अमेरिकेच्या अल-असद एअरबेसला लक्ष्य करत अनेक रॉकेट आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांंनी हल्ले केले. यूएस सेंट्रल कमांडोने सांगितलं की, या हल्ल्यांमध्ये अनेक अमेरिकन जवान जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
इराकी सेवेचा एक सदस्यही जखमी : यूएस सेंट्रल कमांडने ट्विटरवरून माहिती दिली. 20 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता (बगदादची वेळ) इराण समर्थित अतिरेक्यांनी पश्चिम इराकमधील अल-असाद एअरबेसला लक्ष्य करून अनेक बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आणि रॉकेट सोडले. बहुतेक क्षेपणास्त्रे तळाच्या हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे रोखली गेली. तर, काही क्षेपणास्त्रे थेट तळावर पोहोचली. क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणं सुरू आहे. यातील बर्याच अमेरिकन कर्मचार्यांवर उपचार केले जात आहेत. त्यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी घेतली जात आहे, असंही ते म्हणालेत. या हल्ल्यात इराकचा एक सदस्यही जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलंय.
अमेरिकन सैन्याने हुथी बंडखोरांच्या स्थानांना केलं लक्ष्य : अमेरिकन सैन्याने हुथी बंडखोरांच्या तळांना लक्ष्य केलं होतं. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन सैन्यदलानं मंगळवारी येमेनमध्ये असलेल्या हुथी बंडखोरांच्या तळांवर हल्ला केला. व्हाईट हाऊसने मंगळवारी एक निवेदन जारी केलं, की अमेरिकन सैन्याने हौथी बंडखोरांकडून वापरल्या जाणार्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा नाश केला आहे. तसंच, अमेरिकन अधिकार्यांचा हवाला देत म्हटलंय की, अमेरिकन सैन्यानं हुथी बंडखोरांच्या चार जहाजविरोधी क्षेपणास्त्रांवर हल्ला केला आहे. यापूर्वी, लाल समुद्रात ग्रीक मालकीच्या जहाजावर हुथी बंडखोरांनी हल्ला केला होता.
काही दिवसांपूर्वी लाल समुद्रातील जहाजावर केला होता हल्ला : लाल समुद्रातील जहाजावरील हल्ल्यानंतर यूएस आणि मित्र राष्ट्रांनी बंडखोरांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हुथींनी अमेरिकेच्या जहाजांना पहिल्यांदा लक्ष्य केलं. या युद्धनौकेवर दोनदा क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला. मात्र, या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नाही. दोन्ही क्षेपणास्त्रे एडनच्या आखातातील जहाजापासून 11 मैल अंतरावर पडल्याचे अमेरिकन सैन्यदलानं सांगितलं. यूएसएस मेसन आयझेनहॉवर कॅरियर स्ट्राइक ग्रुपचा एक भाग आहे. सेंट्रल पार्क नावाच्या व्यापारी जहाजाचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला होता. याबाबत माहिती मिळताच जहाजाच्या सुरक्षेसाठी (USS) मेसन सेंट्रल पार्क येथे पोहोचले. यूएसएस मेसनला पाहताच व्यापारी जहाजाचे अपहरण करणारे पळू लागले. पण यूएसएस मेसनने त्यांना पकडले. यानंतर यूएसएस मेसन ऑपरेशन पूर्ण करून परतत असताना एडनच्या आखातात मिसाइलने हल्ला करण्यात आला.
समुद्राच्या दक्षिणेकडील भागात कार्यरत : युद्धनौका आणि पाणबुडीने सुरू केलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॉंम्बसह 28 ठिकाणी आणि 60 हून अधिक ठिकाणांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्याचा पहिला दिवस होता. शनिवारी अमेरिकन सैन्याने हुथी रडार साइटवर हल्ला केला. यूएस आर्मीच्या सेंट्रल कमांडने एका निवेदनात म्हटले आहे की, लाल समुद्राच्या दक्षिणेकडील भागात कार्यरत असलेल्या अर्लेघ बर्क-क्लास डिस्ट्रॉयर यूएसएस लॅबूनला हुथी गोळीबारानं लक्ष्य केलं होते. शुक्रवारी, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हल्ल्यांच्या पहिल्या दिवशी, 28 ठिकाणी हल्ले झाले. 60 हून अधिक लक्ष्यांवर लढाऊ विमाने, युद्धनौका आणि पाणबुडीने सोडलेल्या क्रूझ क्षेपणास्त्रे आणि बॉम्बने मारले गेले. त्यानंतर शनिवारी अमेरिकन सैन्याने हुथी रडार साइटवर हल्ला केला.
हेही वाचा :
1 पाकिस्तानला दणका; सीमा भागातील दहशतवादी तळांवर इराणचा 'सर्जिकल स्ट्राईक'
2 पाकिस्तानचा इराणवर हवाई हल्ला, 7 जणांचा मृत्यू
3 सरकार बांगलादेशप्रमाणे म्यानमार बॉर्डरवरही कुंपण लावणार, मुक्त हालचालींवर लवकरच निर्बंध