Israel warning to Hezbollah : इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलन हाइट्समधील माजदल शम्स शहरातील फुटबॉल मैदानावर रॉकेट हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 12 लहान मुलांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे हिजबुल्लाहचा हात आहे, असा आरोप इस्रायलकडून केला जात आहे. हिजबुल्लाहनं गेल्या दहा महिन्यांत केलेला हा सर्वात मोठा हवाई हल्ला आहे. या हल्ल्यामुळे इस्रायलच्या परराष्ट्र मंत्री इस्रायल पॅट्झ यांनी थेट युद्धाचा इशारा दिला आहे. मात्र, हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिलाय.
Millar Maadad al-Shaar, 10
— Israel Defense Forces (@IDF) July 28, 2024
Alma Ayman Fakhr al-Din, 11
Naji Taher Halabi, 11
Yazan Naif Abu Salah, 12
Izil Nashat Ayoub, 12
Finis Adham Safadi, 12
John Wadie Ibrahim, 13
Hazem Akram Abu Salah, 15
Fajr Laith Abu Salah, 16
Amir Rabi Abu Salah, 16
Nazem Fakher Saeb… pic.twitter.com/GQ3ElGYvQk
हमास नंतरचा सर्वात मोठा हल्ला : इस्रायलच्या सैन्यदलाच्या दाव्यानुसार, 7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांवर झालेला हा सर्वात प्राणघातक हल्ला आहे. गोलन हाइट्समध्ये झालेल्या हल्ल्यात 12 मुलांचा मृत्यू झाला. तर 44 जण जखमी झाले. हिजबुल्लाहनं आपल्या सैनिकांच्या हत्येचा बदला म्हणून हा हल्ला केल्याचा इस्रायलकडून दावा करण्यात येत आहे. इस्त्रायलच्या सैन्यदलाच्या दाव्यानुसार गोलान हाइट्सवरील रॉकेट हे दक्षिण लेबनॉनमधील चेबा गावाच्या उत्तरेकडील भागातून डागण्यात आले.
मोठी किंमत चुकवावी लागेल : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या हल्ल्यासाठी हिजबुल्लाहला जबाबदार धरलं आहे. ते म्हणाले, "हिजबुल्लाहचा हा प्राणघातक हल्ला पाहून मलाही धक्का बसला आहे. हिजबुल्लाहला याची मोठी किंमत चुकवावी लागेल. या कठीण काळात आपले नातेवाईक गमाविणाऱ्या लोकांसोबत आम्ही आहोत." अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले बेंजामिन नेतन्याहू यांना हल्ल्याची माहिती मिळताच ते तातडीनं मायदेशी परतले.
इस्रायली लष्कराकडून आरोप : इस्रायलचे सैन्यदलाचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "या हल्ल्यानं हिजबुल्लाहचा खरा चेहरा समोर आलाय. ही एक दहशतवादी संघटना आहे. हिजबुल्लाहनं शनिवारी संध्याकाळी फुटबॉल खेळणाऱ्या मुलांना लक्ष्य करून हल्ला केला."
From the analysis of the IDF's operational systems, the rocket launch at the center of Majdal Shams was carried out from an area located north of the village of Chebaa in southern Lebanon.
— Israel Defense Forces (@IDF) July 27, 2024
According to reliable intelligence information in the possession of the IDF, Hezbollah is… pic.twitter.com/lK5jU8liwq
इस्रायल युद्ध पुकारणार का? : "या हल्ल्यामुळे हिजबुल्लाहनं आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांना जशास तसे उत्तर आम्ही नक्कीच देऊ. हिजबुल्लाहबरोबर आमचं युद्ध कधीही सुरू होऊ शकते," असा थेट इशारा परराष्ट्रमंत्री इस्रायल पॅट्स यांनी दिला. हिजबुल्लाहच्या या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत थेट युद्धाचा धोका वाढला आहे. "आम्ही लेबेनॉनला बेचिराख करून अश्मयुगात पाठवू शकतो," असं इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी सांगितलं.
Hezbollah’s terrorism doesn't differentiate between age, religion, ethnicity or gender.
— Israel Defense Forces (@IDF) July 28, 2024
We mourn the loss of 12 children from Majdal Shams who were murdered playing soccer on Saturday. pic.twitter.com/6rK9DNh50J
हेही वाचा-