गाझा Israel Hamas War : गाझामध्ये हमास आणि इस्राइल (Hamas And Israel) यांच्यात पुन्हा एकदा युद्ध सुरू झाले आहे. गाझातून इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेयांच्यात गेल्या आठ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. यादरम्यान इस्रायली लष्कर सातत्याने हवाई आणि जमिनीवर हल्ले करत आहे. मात्र पाच महिन्यांनंतर रविवारी हमासने इस्राइलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्र हल्ला केलाय. गाझामधून क्षेपणास्त्रांचा बंदोबस्त पाहिल्यानंतर तेल अवीवमध्ये एकच हाहाकार झालाय. हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले आणि लोक सुरक्षित स्थळी रवाना होताना दिसले.
कोणतीही जीवितहानी नाही : मिळालेल्या माहितीनुसार, हमासने जानेवारीपासून गाझामधून कोणताही मोठा हल्ला केलेला नाही. पण युद्धबंदीच्या आशा संपुष्टात आल्यावर आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशानंतर हमासचा हवाई हल्ला आश्चर्यकारक आहे. मात्र, या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आयडीएफनं बहुतेक क्षेपणास्त्रे हवेत नष्ट केली.
हमासकडून क्षेपणास्त्र डागली : इस्राइल संरक्षण दलानं सांगितलं की, गाझामधील रफाह येथून मध्य इस्राइलच्या दिशेने रॉकेट हल्ला करण्यात आला. यापैकी अनेक रॉकेट आयडीएफनं हवेत डागले. रविवारी सकाळपासून केरेम शालोम क्रॉसिंगद्वारे गाझामध्ये मानवतावादी मदत पोहोचवली जात आहे, परंतु हमासकडून क्षेपणास्त्र डागली जात आहेत. हमासने आपल्या नागरिकांविरुद्ध झिओनिस्ट नरसंहाराला प्रत्युत्तर म्हणून तेल अवीववर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला असल्याचं सांगितलं.
इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत : इस्रायलवर हमासचा हल्ला अशा वेळी झाला आहे की, जेव्हा दक्षिण इस्रायलमधून गाझापर्यंत मदत सामग्री घेऊन जाणाऱ्या ट्रकला मान्यता देण्यात आली आहे. नव्या करारानुसार हे मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रकना गाझामध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली आहे, मात्र आता हमासच्या हल्ल्यानंतर हा नवा करारही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळं आधीच संकटाचा सामना करणाऱ्या गाझाच्या लोकसंख्येच्या समस्या आणखी वाढणार आहे. एक दिवस आधी इस्रायलमधील रफाह येथे हवाई हल्ल्यात पाच पॅलेस्टिनी ठार झाले होते. इस्त्रायली रणगाडे रफाहमध्ये घुसले आहेत. रफाहमध्ये मोठ्या प्रमाणात हमासचे लढवय्ये लपले असल्याचा दावा इस्रायलनं केलाय. यामुळेच जागतिक दबावाला न जुमानता इस्रायल रफाहमध्ये लष्करी कारवाईवर ठाम आहे.
हेही वाचा -
- निवृत्त भारतीय सैन्यदल अधिकारी वैभव काळे यांचा 'हमास'च्या हल्ल्यात मुत्यू, कुटुंबीयांवर कोसळला दु:खाचा डोंगर - Vaibhav Kale dies in Hamas attack
- युद्धबंदी संपताच इस्रायलचा गाझावर 'एअर स्ट्राईक'; 175 पॅलेस्टाईन नागरिकांचा मृत्यू
- इस्रायल हमासमध्ये तात्पुरती युद्धबंदी; इस्रायलच्या मंत्रिमंडळानं दिली मंजुरी, इराणची इस्रायलवर टीका