ETV Bharat / international

रशियातील चर्चवर दहशतवादी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, तीन दिवसांचा शोक पाळणार - Terror Attack In Russia

author img

By ANI

Published : Jun 24, 2024, 8:18 AM IST

Updated : Jun 24, 2024, 8:19 PM IST

Terror Attack In Russia : रशियातील दागेस्तान या परिसरातील चर्चवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तब्बल 20 जण ठार तर 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा रक्षकांना यश आलं.

Terror Attack In Russia
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)

मॉस्को Terror Attack In Russia : दहशतवाद्यांनी चर्चवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 20 जण ठार तर 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला रशियातील दागेस्तान या दक्षिणेकडील प्रांतात केला आहे. रशियाच्या रिपब्लिक ऑफ दागेस्तानच्या तपास संचालनालयानं दहशतवादी हल्ल्याप्रकरणी रशियन फेडरेशनच्या फौजदारी संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या समितीनं तपास सुरू केल्याची माहिती तपास संचालनालयाच्या प्रवक्त्यानं दिली आहे. डर्बेंट आणि मखाचकला शहरातील चर्च, सिनेगॉग आणि पोलीस ट्रॅफिक स्टॉपमध्ये हा हल्ला करण्यात आल्याची माहितीही या प्रवक्त्यानं दिली.

सनातन चर्च, सिनेगॉगमध्ये दहशतवादी हल्ला : दहशतवाद्यांनी चर्चमध्ये हल्ला करुन धर्मगुरुची हत्या केली. तर चर्चच्या सुरक्षा रक्षकालाही गोळ्या घालण्यात आल्याची माहिती तपास संचालनालयानं दिली. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही पोलीस आणि एका धर्मगुरुची हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तब्बल 30 ते 40 नागरिक गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. "दहशतवाद्यांनी धर्मगुरु निकोले यांची डर्बेंट चर्चमध्ये हत्या केली. धर्मगुरु निकोले हे 66 वर्षाचे होते. मागील अनेक दिवसांपासून ते आजारी होते. मात्र दहतवाद्यांनी त्यांचा गळा चिरुन हत्या केली," अशी माहिती दागेस्तान पब्लिक मॉनिटरिंग कमिशनचे अध्यक्ष शमिल खादुलाएव यांनी वृत्तसंस्थेला दिली.

पाच हल्लेखोरांना घातलं कंठस्नान : रशियातील चर्चमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत जवळपास 20 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती पुढं आली आहे. रशियाच्या सुरक्षा रक्षकांनी पाच हल्लेखोर दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश मिळवलं. दहशतवाद्यांनी चर्चमधील धर्मगुरुंचा गळा चिरल्यानंतर चर्चच्या सुरक्षा रक्षकाला गोळ्या घालून ठार केलं. तर पोलीस विभागातील काही जवानांना दहशतवाद्यांचा मुकाबला करताना वीरमरण आलं, अशी माहिती रशियाच्या दागेस्तान अंतर्गत व्यवहार मंत्रालयानं वृत्तसंस्थेला दिली.

तीन दिवसांचा शोक पाळणार : दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर दागेस्तानने सोमवारपासून तीन दिवसांचा शोक पाळला आहे. "या घटनेत 20 लोक ठार झाले, त्यापैकी बहुतेक पोलीस आहेत. दोन शहरांमधील चर्चवर हे हल्ले करण्यात आले, " अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या हल्ल्यानंतर परिसरात घबराटीचं वातावरण आहे.

हेही वाचा :

  1. अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ अबुबकर शेखचा जे जे रुग्णालयात मृत्यू - Chhota Shakeel Kin Died
  2. जम्मू-काश्मीरच्या डोडामध्ये सैन्य दलाच्या चौकीवर दहशतवादी हल्ला; 5 जवान आणि 1 पोलीस अधिकारी जखमी - terrorist attack in Jammu Kashmir
  3. तोंडाला कापड बांधून दुचाकीसह ट्रक पेटवला, आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - Bike Burning In Nashik

Last Updated : Jun 24, 2024, 8:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.