ETV Bharat / international

फ्रान्समध्ये नॅशनल लोकसभेच्या 577 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान - French parliamentary election 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 30, 2024, 2:13 PM IST

French parliamentary election : फ्रान्समध्ये नॅशनल लोकसभेच्या 577 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. निवडणुका दोन टप्प्यात होणार आहेत.

French parliamentary election
French parliamentary election (Source- AP Photo)

French parliamentary election 2024 : फ्रान्समध्ये नॅशनल लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान 7 जुलै रोजी होणार आहे. परदेशात राहणारे फ्रेंच नागरिकही या निवडणुकांमध्ये मतदान करू शकतात. दुसऱ्या टप्प्यात फक्त तेच उमेदवार उभे राहू शकतात, ज्यांना पहिल्या टप्प्यात 12.5 टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. नॅशनल असेंब्लीमध्ये बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 289 जागा जिंकणं आवश्यक आहे. फ्रेंच संसदेचा कार्यकाळ 2027 मध्ये संपणार होता. परंतु युरोपियन युनियनमधील मोठ्या पराभवामुळं अध्यक्ष मॅक्रॉन यांनी अविश्वास ठरावाला सामोरे जाण्याचा धोका टाळण्यासाठी त्यांनी निवडणुका जाहीर केल्या आहेत

अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या पक्षाला संसदेत बहुमत मिळाले नाही. सभागृहाने कायदे मंजूर करून घेण्यासाठी त्यांना सतत इतर पक्षांकडून पाठिंब्याची गरज भासत होती. अशा स्थितीत मॅक्रॉन यांना व्यापक विरोधाचा सामना करावा लागला. फ्रान्समध्ये 2022 मध्ये शेवटच्या संसदीय निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी मॅक्रॉन यांच्या पक्षाला स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवता आले नाही.

बहुमत मिळवण्यासाठी 289 जागा जिंकणं आवश्यक : फ्रान्सचे मतदार आज म्हणजेच 30 जून आणि 7 जुलै रोजी संसदेच्या नवीन सदस्यांची निवड करतील. बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 289 जागा जिंकणं आवश्यक आहे. मात्र सध्या मॅक्रॉन यांच्या पक्षाकडे केवळ 250 जागा आहेत. सर्वात मोठा विरोधी पक्ष राष्ट्रीय रॅलीला 88 जागा मिळाल्या होत्या. मात्र, या संख्येत बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. समविचारी पक्षांमधील मतदान आणि राजकीय गतिशीलता यावर बहुतांश निकाल अवलंबून असेल.

577 जागांसाठी मतदान : फ्रान्समध्ये नॅशनल लोकसभेच्या 577 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी 11.30 ते रात्री 9.30 वाजेपर्यंत मतदान होईल. एक्झिट पोल रात्री उशिरापर्यंत समोर येऊ शकतात. आठवडाभरानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. पहिला टप्पा 30 जून रोजी तर दुसरा टप्पा 7 जुलै रोजी पार पडेल.

हेही वाचा

  1. अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प फेस टू फेस; काय आहे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'? - First Presidential Debate
  2. दक्षिण कोरियात लिथियम कारखान्यात भीषण आग; 22 कामगारांचा होरपळून मृत्यू - Fire in Lithium Battery Factory
  3. रशियातील चर्चवर दहशतवादी हल्ला; 20 जणांचा मृत्यू, तीन दिवसांचा शोक पाळणार - Terror Attack In Russia
  4. 'जी सात'ला वाजवीपेक्षा महत्व दिलं जातंय का? इतर जागतिक संघटनांच्या तुलनेत G7 चे महत्त्व काय - Overrated G7

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.