ETV Bharat / international

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर हल्ले ही लाजिरवाणी बाब; जाणून घ्या काय आहे प्रकरण - Attacks On The CPEC

Attacks On The CPEC : चीनच्या मदतीनं पाकिस्तानमध्ये चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) हा प्रकल्प बांधण्यात येत आहे. मात्र या प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी नागरिकांवर वारंवार हल्ले होत आहेत. पाकिस्तानमधील खैबर पख्तुनव्वामधील शांगला जिल्ह्यात चिनी अभियंत्यांवर हल्ला झाला. या हल्ल्यात 5 चीनच्या अभियंत्यासह त्यांचा चालक ठार झाला.

Attacks On The CPEC
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 3, 2024, 5:00 AM IST

Updated : Apr 3, 2024, 8:08 AM IST

हैदराबाद Attacks On The CPEC : चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) मुळे होणाऱ्या हल्ल्यात कामगार ठार झाल्यानं दोन देशाच्या तणावात भर पडली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेनं ग्वादरवर हल्ला केला. तसेच तुर्बतमध्ये पाकिस्तानचा नौदल तळ, पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तुनव्वामधील शांगला जिल्ह्यात चिनी अभियंत्यांवर हल्ला करण्यात आला. हे चिनी अभियंते इस्लामाबादहून दासू येथील जलविद्युत प्रकल्पाकडं जात होते. या हल्ल्यात 5 चिनी अभियंत्यासह त्यांचा चालक या सुसाईड बॉम्बरच्या हल्ल्यात ठार झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशात मोठी खळबळ उडाली आहे.

Attacks On The CPEC
Attacks On The CPEC

पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांना केलं जाते लक्ष्य : चीनच्या पाच अभियंत्यांना हल्ल्यात ठार केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) या संघटनेनं ग्वादर आणि तुर्बत इथल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र कोणत्याही दहशतवादी संघटनेनं चिनी नागरिकांवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नाही. चिनी अभियंत्यांवर हल्ला झाल्याची घटना पाकिस्तानसाठी ही गंभीर आहे. हल्ल्यात ठार झालेल्या चिनी अभियंत्यांचा समावेश असल्यानं या हल्ल्यामुळे बीजिंगमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पाकिस्तानमध्ये चिनी नागरिकांना सातत्यानं लक्ष्य केलं जात असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

दोषींवर कठोर कारवाई करा : चीनच्या नागरिकांवर पाकिस्तानात हल्ले होत आहेत. त्यामुळे चीनच्या प्रवक्त्यानं नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी पाकिस्ताननं सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी चीनच्या प्रवक्त्यानं केली. "चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (CPEC) पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. हा प्रकल्प कधीही यशस्वी होईल. बीजिंगची अस्वस्थता कमी करावी," असं चीनच्या इस्लामाबादमधील प्रवक्त्यानं यावेळी स्पष्ट केलं.

पाकिस्तानमध्ये दहशतवादाला खतपाणी : चीनच्या अभियंत्यांवर हल्ला करण्यात आल्यानं चीनच्या प्रवक्त्यानं पाकिस्तान सरकारला सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर दुसरीकडं पाकिस्ताननं चीनशी मौत्री असल्यानं विरोधी राष्ट्रांवर आरोप केले आहेत. या हल्ल्यात काही विरोधी घटक मदत करण्यात सहभागी आहेत. त्यामुळेच पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घातल्या जात आहे, असा आरोप पाकिस्ताननं केला आहे. पाकिस्ताननं तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ( TTP ) या दहशतवादी संघटनेवर आरोप केला आहे. मात्र तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ( TTP ) या संघटनेनं या हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्ताननं तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान ( TTP ) ला भारताचा पाठिंबा असल्याचा आरोप केला होता.

हेही वाचा :

  1. मैत्रीचा हात पुढे करूनही चिनी नागरिकांवर पाकिस्तानात सातत्यानं हल्ले, यामागे कारण काय? - chinese killed in Pakistan
  2. पाकिस्तानात बसमध्ये शक्तिशाली बॉम्बस्फोट, 9 चिनी नागरिकांसह 13 ठार
  3. चीनच्या कुरापतीने पाकिस्तानची वाढली डोकेदुखी, 'ही' भेडसावत आहे भीती

Last Updated : Apr 3, 2024, 8:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.