ब्राझील Brazil Plane Crash : ब्राझील येथे प्रवासी विमान (Brazil plane crash) कोसळलं. 61 प्रवाशांना घेऊन जाणारं हे विमान शुक्रवारी विन्हेडो प्रांतात कोसळलं असल्याचं (Sao Paulo Plane Crash) वृत्त स्थानिक वृत्तवाहिनीनं दिलं आहे. 'व्होपास लिन्हास एरिआज' कंपनीचं 'एटीआर-72' हे विमान पराना राज्यातील कास्केवेल शहरातून साओ पाऊलोमधील ग्वारुलहोसला जात होतं. शुक्रवारी (9 ऑगस्ट) दुपारी पावणे दोनच्या सुमारास (स्थानिक वेळेनुसार) ही दुर्घटना घडली.
UPDATE - BRAZIL
— MəanL¡LMə♡₩ (@MeanLILMeoW) August 9, 2024
SAN PAULO PLANE CRASH
Radar data - rapid plummet- beyond ability of control - dropping 70,000 thousand feet in 2 mins -
1 Engine at least was NOT WORKING!! I am correct on my information- I STRIVE to put out honest factual news worldwide - pic.twitter.com/kwyig5oxnK
विमान कंपनीनं जारी केलं निवेदन : दरम्यान, एअरलाईन्स कंपनी 'व्होपास'नं एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनाद्वारे त्यांनी विमान अपघाताच्या वृत्ताची पुष्टी केली. त्यांनी निवेदनात म्हटलं आहे की, साओ पाऊलो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ग्वारूलहोसला जाणारं एक विमान कोसळलं. या विमानात एकूण 57 प्रवासी होते. तसेच पायलटसह चार कर्मचारी देखील होते. विमान कंपनीनं निवेदन जारी केलं असलं तरी ही विमान दुर्घटना कशामुळं झाली ते अद्याप स्पष्ट झालं नाही.
विमान कोसळतानाचे व्हिडिओ आले समोर : विमानातील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यानंतर विमानाचा विमानतळाशी संपर्क तुटला. त्यानंतर काही वेळातच हे विमान थेट खाली कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विमान नेमकं कशामुळं कोसळलं? विमानात आग कशामुळं लागली? हे अद्याप समजू शकलं नाही. विमान कोसळल्याचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या व्हिडिओंची खातरजमा ईटीव्ही भारत करत नाही.
धावपट्टीवरून घसरल्यानं कोसळलं विमान : या आधीही 24 जुलै रोजी अशीच एक घटना घडली होती. काठमांडू विमानतळावरून उड्डाण करताना विमान धावपट्टीवरून घसरल्यानं ते कोसळलं होतं. या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला होता. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, विमान काठमांडूहून पोखराकडं रवाना होणार होतं. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील माहिती अधिकारी ज्ञानेंद्र भुल यांनी ही माहिती दिली होती. विमान उड्डाणावेळी त्यात फक्त तांत्रिक कर्मचारीच होते.
हेही वाचा -