ETV Bharat / health-and-lifestyle

World Oral Health Day 2024: तोंड सांभाळून... मुखारोग्याकडं दुर्लक्ष केल्यानं कर्करोगात भारत आहे जगाची राजधानी! - World Oral Health Day 2024

जगभरात आज ( २० मार्च) जागतिक मुखारोग दिन साजरा केला जातो. तोंडाचे आरोग्य चांगलं ठेवणं हे शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्व असते.

World Oral Health Day 2024
World Oral Health Day 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 8:17 AM IST

नवी दिल्ली- तोंडाचे आरोग्य म्हणजे तुमच्या शरीराच्या आरोग्याचा आरसा आहे. त्याचं जगाला महत्त्व कळण्यासाठी जागतिक दंत परिषदेनं (FDI World Dental Federation) २०११ मध्ये जागतिक दंत काँग्रेसच्या वार्षिक बैठकीत जागतिक मुखारोग्य दिन साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव एकमतानं मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २० मार्च २०१३ ला जगात पहिल्यांदाच जागतिक मुखारोग्य साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिन साजरा करत तोंडाची स्वच्छता आणि आरोग्याचं महत्त्व नागरिकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो.

  • यंदा जागतिक मुखारोग्य दिनाची संकल्पना ही अत्यंत लक्ष वेधून घेणारी आहे. 'आनंदी मुख म्हणजे आनंदी शरीर', अशी संकल्पना आहे. त्याचा अर्थ तोंडाचे चांगले आरोग्य ठेवले तर शरीराचे आरोग्य चांगले राहते. तोंडाच्या आरोग्याचा थेट संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी संबंध आहे.

तोंडाच्या आरोग्याचे महत्त्व- दातांच्या समस्या टाळण्याकरिता तोंडाची स्वच्छता ठेवणं आवश्यक असतं. जेवण केल्यानंतर तोंडात चुळ भरणे आणि रोज दोन वेळा ब्रश केल्यानं दातांच्या विविध समस्या टळू शकतात. या गोष्टींकडं दुर्लक्ष केल्यास दातांमध्ये फटी निर्माण होणं, हिरड्यांचे आजार आणि तोंडाची दुर्गंधी अशा समस्या निर्माण होतात. तोंडाचे आरोग्य सांभाळले तर दातांच्या समस्या निर्माण होणार नाहीत. त्याचबरोबर उपचारांसाठी आर्थिक खर्चही टळू शकतो.

स्वच्छतेकडं दुर्लक्ष केल्यास काय होतात समस्या- तोंडाची स्वच्छता नसेल तर विविध आजारांना निमंत्रण मिळते. त्यामध्ये मधुमेह, श्वसनासंबंधी संसर्ग यांचा समावेश आहे. तोंडातील जीवाणू हे शरीरात प्रवेश केल्यानंतर विविध रोग होऊ शकतात. त्यामुळे संपूर्ण शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी तोंडाची स्वच्छता ठेवण्याची गरज असते. अन्न बारीक चावून खाण्यासाठी आणि चांगले अन्नपचन होण्यासाठी निरोगी दात आणि हिरड्या आवश्यक असतात. अन्यथा पुरेसा आहार शरीराला मिळणार नाही. त्याचाच परिणाम म्हणून विविध जीवनसत्वांची शरीरात कमतरता निर्माण होते.

तोंडाच्या कर्करोगात भारत ही जगाची राजधानी- एका सर्वेक्षणानुसार देशातील ८५ ते ९० टक्के प्रौढांना तोंडाच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तोंडाची स्वच्छता न ठेवणाऱ्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक असते. जगभरात तोंडाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. त्यामुळे भारताला तोंडाचा कर्करोग असलेली जगाची राजधानी मानलं जाते. दात अथवा तोंडाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावेत. जेणेकरून भविष्यात आरोग्याचं होणारं नुकसान टळू शकते.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.