Disadvantages Of Air Conditioning : उन्हाळा आला की लोक एसीमध्ये जास्त वेळ घालवतात. एसीची थंड हवा उष्ण हवेच्या फटक्यापासून लोकांना दिलासा देते. पण ही थंड हवा जेवढी चांगली वाटते तेवढीच ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर आपण एसीमध्ये जास्त वेळ बसलो तर एसीच्या थंड हवेमुळं आपल्या आरोग्याला अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. आज या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एसीच्या थंड वाऱ्यामुळं तुमच्या आरोग्याला काय हानी पोहोचू शकते ते सांगणार आहोत.
सहसा घरांमध्ये १ किंवा २ एसी असतात. परंतु कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात एसी असतात, जे दिवसभर सुरू असतात. एसीच्या अतिवापरामुळे ग्लोबल वॉर्मिंगही वाढत आहे. एसीमधून बाहेर पडणारे विषारी वायू हे त्याचं मुख्य कारण आहे. एसी सुरू असतो तेव्हा त्यातून क्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि हायड्रो-क्लोरोफ्लोरोकार्बन्स सारखे हानिकारक वायू बाहेर येत असतात, ज्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. हे वायू उष्णता निर्माण करतात आणि ओझोन थर खराब करतात.
एसीच्या अतिवापरामुळे आणखी काय काय तोटे होऊ शकतात, याबाबत महत्वाचे मुद्दे पाहूयात...
- एसीचा अतिवापर आपल्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकतो. एसीचा सतत वापर केल्याने एसीचा एअर फिल्टर खराब होतो आणि खराब हवा बाहेर येते. यामुळे तुम्हाला ॲलर्जीही होण्याची शक्यता असते.
- एसीसमोर जास्त वेळ बसल्याने त्वचेला सुरकुत्या पडू शकतात. कारण एसीची थंड हवा घाम शोषून घेते. पण यासोबतच शरीरातील आर्द्रता देखील शोषून घेते, त्यामुळे शरीरात आणि त्वचेत पाण्याची कमतरता दिसते आणि सुरकुत्या दिसू लागतात.
- जेव्हा आपण एसीसमोर बराच वेळ बसतो तेव्हा आपलं शरीर खूप थंड होतं आणि त्याचा आपल्या हाडांवरही विपरीत परिणाम होतो. जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही जुनी समस्या असेल तर एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने ही समस्या आणखी वाढू शकते.
- एसीमध्ये बसल्याने कमी रक्तदाबाची लक्षणे वाढू शकतात. अशा परिस्थितीत कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तीने एसीसमोर मर्यादित वेळ बसावं.
- एसीमधे सीएफसी गॅस असतो. हा सीएफसी वायू हवेत मिसळतो आणि नंतर बाह्य वातावरणाला हानी पोहोचवतो. एसी खोलीतील उष्णता शोषून घेतो आणि खोलीचं तापमान कमी करतो. परंतु शोषून घेतलेली गरम हवा बाहेर सोडतो. यामुळे वातावरणातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
- एसीच्या अतिवापरामुळे श्वसनसंस्थेला त्रास होण्याची शक्यता तसेच ॲलर्जी, डोळे दुखणे, घसा खवखवणे अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
हेही वाचा
- भिजवलेले बदाम शरीरासाठी एकदम योग्य... - FIVE BENEFITS OF ALMONDS
- 'या' रंगाची लघवी होत असल्यास सावधान, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात - Health Tips
- मधमाशा केवळ आरोग्यासाठीच नाही तर निसर्गासाठीही आहेत उपयुक्त - World Bee Day 2024
- उन्हाळ्यात मेकअप जास्त काळ टिकावा याकरिता फॉलो करा खालील टिप्स - Makeup Tips
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतेही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)