ETV Bharat / health-and-lifestyle

शेवग्याची पानं चघळण्याचे चमत्कारिक फायदे; 'या' आजारापासून होते सुटका - Benefits Of Moringa Leaves - BENEFITS OF MORINGA LEAVES

Benefits Of Moringa Leaves: मोरिंगाची पानं आपल्या आरोग्यासाठी आर्शीर्वादापेक्षा कमी नाहीत. यामुळे हृदयविकार, यकृत तसंच मधुमेहासारख्या धोका कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज सकाळी पानं खाल्ल्यानं आठवड्याभरात तुम्हाला शरीरामध्ये विलक्षण बदल दिसून येईल

Benefits Of Moringa Leaves
शेवग्याच्या पानांचे फायदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 1:49 PM IST

हैदराबाद Benefits Of Moringa Leaves: बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक सायलेंट किलर आजार लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांना घेरत आहेत. आजारमुक्त जीवन जगण्याकरिता आपल्या आहारात काही बदल करणे गरजेचं आहे. परंतु कित्येकांना आपल्या परिसरात सहज उपलब्ध असलेल्या मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या पानांचे आरोग्याला होणारे असंख्य फायदे माहिती नाहीत. शेवग्याचं झाड हे जादू पेक्षा कमी नाही. भारतात शतकानुशतके आयुर्वेदात याचा वापर केला जात आहे. या झाडाचं प्रत्येक घटक आरोग्यासाठी उपयुक्त आहे. फळ, बिया आणि मुळ हे पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. परंतु पानं सर्वात आरोग्यदायी मानली जातात.

एनसीबीआयच्या अहवालानुसार मोरिंगाच्या पानांमध्ये जीवनसत्व ए, सी आणि ई खनिजे,(कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह) तसंच शरीरासाठी अत्यावश्यक असलेलं अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात आहे. त्याचबरोबर क्वेर्सेटिन, क्लोरोजेनिक ॲसिड, बीटा-कॅरोटीन यासारख्या अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणत आहेत. त्यामुळे मोरिंगाच्या सेवनाने आयुर्मान कमी करणारे 7 आजार आपण सहज टाळू शकतो.

रक्तदाब समस्या : मोरिंगाच्या पानांमध्ये असणारं अँटिऑक्सिडंट्स क्वेर्सेटिन रक्तदाब कमी करण्यास मदत करते. तसंच पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधून रक्त परिसंचरण सुलभ करते.

मधुमेह ग्रस्तांसाठी फायदेशीर : मोरिंगा पानांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. तसंच यामध्ये असलेलं फायबर रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करतो. परिणामी मधुमेहाचा धोका कमी होतो.

कोलेस्टेरॉल कमी : मोरिंगा पानांमध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स पुरेशा प्रमाणात असतात. यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

निरोगी हृदय : मोरिंगाची पानं रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियममुळे हृदयाचे ठोके नियंत्रित राहतात. तसंच हृदयासंबंधित इतर आजारांचा धोका कमी होतो.

वजन नियंत्रण : मोरिंगा पानं चयापचन वाढवण्यास उपयुक्त आहेत. यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त मोरिंगमधील क्लोरोफिल वजन कमी करण्यास मदत करतो.

त्वचा आणि केसांची काळजी : मोरिंगाच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे त्वचा आणि केस निरोगी आणि चमकदार राहतात.

पचनसंस्था सुधारते : मोरिंगाच्या पानांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसंच बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्यापासून देखील आराम मिळतो.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. उपाशीपोटी पाणी पिण्याचे जबरदस्त फायदे; आजच करा सुरु - Benefits Of Drinking Water
  2. तुमच्या जिभेचा रंग कोणता आहे? रंगावरून ओळखा शरीरात असणारे आजार - Tongue Color Shows Body Health

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.