हैदराबाद PUMPKIN SEEDS BENEFITS : भोपळ्याची भाजी म्हटलं की, बरेच जण नाकं मुरडतात. भोपळ्यापासून विविध पदार्थ देखील बनवले जातात. जसं की सांबार, खीर, बोंडा. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी भोपळ्याचे बोंडे खाल्ले असतील. परंतु बऱ्याच जणांना भोपळ्याचं नाव ऐकताच चिडचिड होते. भोपळ्याची भाजी आपल्या आरोग्यासाठी फारच लाभदायी आहे. विशेष म्हणजे भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर पोषक घटक असतात. भोपळ्याच्या बियांच्या फायद्याबद्दल अनेकांना माहिती नसल्यामुळे बरेचजण भाजीतील बिया फेकून देतात. तुम्ही देखील बिया फेकून देत असाल तर जरा थांबा. कारण भोपळ्याच्या बियांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. विशेष म्हणजे भोपळ्याचं सेवन पुरुषांसाठी जास्त फायदेशीर आहे. भोपळ्याच्या बिया पुरुषांमधील विशिष्ट प्रकारच्या आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून काम करतात असं म्हटलं जातं.
- हृदयाचे आरोग्य : भोपळ्याच्या बियांमध्ये विविध अँटिऑक्सिडंट्स, कॅल्शियम, लोह, प्रथिने, पोटॅशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, बी12 यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. तसंच यामध्ये असलेलं मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स हृदविकाराचा धोका कमी करण्यास उपयुक्त आहेत.
- मूत्रपिंडाचे कार्य : भोपळ्याच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने त्यांचं सेवन केल्यास मूत्रपिंडाचे कार्य सुधारते. तसंच, यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता कमी होते.
- शुक्राणूंची गुणवत्ता वाढवते : भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक मुबलक प्रमाणात असते. झिंक पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यास उपयुक्त आहे. तसंच टेस्टोस्टेरॉनची पातळी आणि शुक्राणूंची गुणवत्ता देखील वाढण्यास फायदेशीर आहे.
- 2014 मध्ये, जर्मन संशोधन उपक्रम नैसर्गिक नेफ्रोलॉजी (GRANU) ने भोपळ्याच्या बियांवर एक अभ्यास केला. या संशोधनात 1,431 पुरुषांना (50-80 वर्षे वयोगटातील) भोपळ्याच्या बिया देण्यात आल्या. त्या अभ्यासात, संशोधकांना असं आढळून आलं की, जे पुरुष दररोज भोपळ्याच्या बियांचं सेवन करतात त्यांचे प्रोस्टेट निरोगी होते. तसंच प्रोस्टेट कॅन्सरच्या समस्येवर भोपळ्याच्या बिया फायदेशीर आहेत. नियमित सेवन केल्यास प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो.
- रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत : भोपळ्याच्या बियांमध्ये मॅंगनीज, जस्त, फॉस्फरस, तांबे यासारखी अनेक खनिजे आढळतात. यामुळे रक्तदाब सामान्य राहतो.
- पाचन सुधारते : भोपळ्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत : भोपळ्यामध्ये अॅंटीऑक्सिडंट्स आणि झिंक मुबलक प्रमाणत आढळतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यास मदत होते. तसंच हंगामी संसर्गजन्य आजार टाळण्यास देखील भोपळा फायदेशीर आहे.
- हाडांचे आरोग्य सुधारते : भोपळ्यामध्ये लोह, मॅग्नेशियम, जस्त आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात. त्यामुळे हाडांचे आरोग्य चांगले राहाते.
- तणाव आणि चिंताग्रस्त असलेले लोक भोपळ्याच्या बिया खाऊन तणाव कमी करू शकतात.
- विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांनी दररोज एक चमचा भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहाते.
- भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने निद्रानाश दूर होतो, असं वैद्यकीय तज्ञ सांगतात. यामुळे रात्रीची चांगली झोप येते, शारीरिक आरोग्य सुधारते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )