ETV Bharat / health-and-lifestyle

आता घरीच तयार करा टपरी सारखा 'मसाला चहा' - MASALA TEA RECIPE

Masala Tea: चहाच्या विविध व्हेरायटी तुम्ही घेतली असेल. मात्र, टपरीवरचा मसाला चहानं सर्वांना भूरळ घातली आहे. परंतु, असा चहा घरी तयार करताना आपली फजिती होते.

How To Make Masala Tea At Home
मसाला चहा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 11, 2024, 11:12 AM IST

How To Make Masala Tea At Home : चहा प्रेमींसाठी चहा एक एनर्जी बुस्टर सारखं आहे. त्यातही मसाला चहाचे अनेक चाहते आहेत. मित्रांसोबत गप्पा मारताना टपरीवर आपल्यापैकी अनेक लोकं मसाला चहाचा आस्वाद घेतात. हा चहा पिल्यानंतर अंगात जी तरतरी येते त्यास कोणतीही तोड नाही. कडक मसाला चहाचा सुगंधचं चहा पिणाऱ्याला तृप्त करते. परंतु, टपरीवर तयार होणारा हा चहा आपल्याला घरी तयार करताना फजिती होते. टपरीसारखा टेस्टही चहाला येत नाही. यामुळे घरी निवांत बसून मसाला चहा पिण्याची इच्छा शेवटी इच्छाच रहाते. मात्र, आता तुम्ही टेंशन घेऊ नका. आपण आज टपरीसारखा मसाला चहा घरीच तयार करणार आहोत. जाणून घ्या मसाला चहा तयार करण्याची विधी.

How To Make Masala Tea At Home
मसाला चहा (ETV Bharat)
  • आवश्यक साहित्य
  • दूध - 250 मि.ली
  • किसलेले आले - 2 टीस्पून
  • चहा पावडर - 3 टीस्पून
  • लवंग - ४ नग
  • वेलची - ५ नग
  • दालचिनी - लहान तुकडा
  • गुलाबाच्या पाकळ्या - 2 टीस्पून
  • साखर - आवश्यकतेनुसार
  • कृती : एका पातील्यात दूध घेऊन ते उकडी येत पर्यंत तापवा. त्यानंतर दूध बाजूला ठेवा. दुसऱ्या एका पातील्यात एक ग्लास पाणी घ्याला आणि ते सुद्धा चांगलं उकडून घ्या. पाणी उकडल्यानंतर त्यात किसलेलं आलं घाला, वेलची, लवंगा आणि दालचिनी घालून पुन्हा उकडून द्या. आता त्यात 3 चमचे चहा पावडर आणि पुरेशी साखर घाला आणि हे सुद्धा उकडू द्या. चांगलं उकडल्यानंतर त्यात दूध घाला. चहाची चव वाढवण्यासाठी त्यात गुलाबाच्या पाकळ्या घाला आणि चहा पुन्हा मध्यम आचेवर 5 ते 10 मिनिटं तापवा. चहा उकडल्यानंतर गॅस बंद करा आणि एका कपमध्ये चहा ओतून घ्या. झालं तुमचा मसाला चहा रेडी.

हेही वाचा

  1. या दसऱ्यात घरीच बनवा स्वादिष्ट 'रसमलाई'
  2. मऊ अन् लुसलुशीत चपाती हवीय? मग ही ‘ट्रिक’ नक्की वापरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.