ETV Bharat / health-and-lifestyle

झिका व्हायरसची लक्षणं असणाऱ्यांना 'या' ठिकाणी मिळतील स्वस्तात औषधं, किंमत 80 टक्क्याहून कमी - Generic Aadhaar - GENERIC AADHAAR

Zika Virus Medicines In Cheap Rate : महाराष्ट्रामध्ये झिकाची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असतानाच आता झिका व्हायरसच्या लक्षणांवर प्रभावी औषधं अगदी स्वस्त दरात देण्याची मोहीम 'जेनेरिक आधार'नं सुरू केलीय.

People with symptoms of Zika virus can get medicines in cheap rate at 'Generic Aadhaar Medical Store'
झिका व्हायरस (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 12:50 PM IST

ठाणे Zika Virus Medicines In Cheap Rate : सध्या देशभरात झिका व्हायरसनं जोर धरलाय. एडीस डास चावल्यानं या व्हायरसची लागण होते. जागतिक आरोग्य संघटनेनं देखील या गंभीर आजाराची दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. कोरोनासारखं या व्हायरसनंही रौद्र रूप धारण करू नये, म्हणून केंद्र आणि राज्य सरकारनं याकडं विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय. याच पार्श्वभूमीवर आता 'जेनेरिक आधारनं' झिका व्हायरसच्या लक्षणांवर प्रभावी औषधं अगदी स्वस्त दरात देण्यात येणार असल्याचं जाहीर केलय. तसंच औषधांवर सरसकट 80 टक्के सूट देण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय.

औषधं कुठून घ्यावी : जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांनी कोरोना काळात रेमडीसीवीर सारखी औषधं मोफत दिली होती. त्यानंतर आता झिका व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघून गरजूंना स्वस्त दरात औषधं मिळावीत यासाठी त्यांनी झिका व्हायरसच्या लक्षणांवरील औषधांवर मोठ्या प्रमाणात सूट दिलीय. तर झिका व्हायरसची लक्षणं आढळळ्यास आपण जेनेरिक आधारमधून कमी दरात औषधं घ्यावी, असं आवाहनही अर्जुन देशपांडे यांनी केलंय.

सर्वांनी एकत्रित काम केलं तर झिका व्हायरस आजारावर आपण निश्चितच मात करू - अर्जुन देशपांडे, संस्थापक, जेनेरिक आधार

या उपक्रमाला शासनानंही पाठिंबा द्यावा : जेनेरिक आधारनं जाहीर केलेल्या मदतीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी तथा वैधकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले, "जेनेरिक आधारच्या या उपक्रमाला शासनानंही पाठिंबा दर्शवत प्रोत्साहन द्यायला हवं. समाजातील सर्व घटकांनी पुढं येऊन या आजाराविरोधात जनजागृती करावी. जेनेरिक आधारचा हा उपक्रम खरोखरच अनेक गरजूंना आधार देईल. झिका व्हायरस, डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांवरील काही औषधं अत्यंत महाग दरात मिळतात, अशावेळी जेनेरिक आधारच्या या मोहिमेचा लाभ घ्यावा. तसंच शासनही अशा मोहिमेची दखल घेऊन आवश्यक ती सर्व मदत करेल", असंही ते म्हणाले.

हेही वाचा -

  1. महाराष्ट्रातील झिका रुग्णांच्या वाढणाऱ्या संख्येचा केंद्रानं घेतला धसका, राज्यांना दिला 'हा' महत्वाचा सल्ला - Zika Virus in Maharashtra
  2. पुण्यात आढळला झिकाचा चौथा रुग्ण, महापालिकेचा आरोग्य विभाग लागला कामाला - Zika Virus In Pune
  3. पुण्यात झिकाचा प्रादुर्भाव, एरंडवण्यात डॉक्टरसह मुलीला झिकाची लागण - Zika Virus Patients

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.