ETV Bharat / health-and-lifestyle

तोंडी लावायला झटपट तयार करा झणकेदार मिरची मसाला फ्राय

How To Make Mirchi Masala Fry: तुम्हालाही जेवणासोबत तोंडी लावायला झणझणीत पदार्थ हवेत. तर आजच करा मिरची मसाला फ्राय

How To Make Mirchi Masala Fry
मिरची मसाला फ्राय (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 21, 2024, 7:42 PM IST

How To Make Mirchi Masala Fry: महाराष्ट्रीयन लोकांना झणझणीत पदार्थ फार आवडतात. खास जेवणात तोंडी लावणे हा प्रकार नियमच आहे. चटणी, लोणचं, कोशिंबिर, पापड, ठेचा, लसणाची चटणी, मिरचीचा खर्डा असल्यास जेवणाची रंगत वाढते. तुमच्या तोंडाची चव वाढवण्यासाठी आज आम्ही तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलोय. ती म्हणजे मसाला मिरची फ्राय. मिरची फ्राय तयार करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत. चला तर जाणून घेऊया मिरची मसाला फ्राय तयार करण्याची साधी आणि सोपी पद्धत.

  • मसाला मिरची फ्राय साठी साहित्य
  • मोठ्या आकाराच्या मिरच्या 1/2 किलो
  • चणा डाळ पीठ - अर्धी वाटी
  • हळद - अर्धा टीस्पून
  • मिरची - 2 चमचे
  • धने पावडर - 2 चमचे
  • आमचूर पावडर - 2 चमचे
  • गरम मसाला - अर्धा टीस्पून
  • जिरे पावडर - अर्धा टीस्पून
  • कसूरी मेथी - 1 टीस्पून
  • मीठ - चवीनुसार
  • तेल - 4 टेस्पून
  • लसणाच्या पाकळ्या - ४
  • लिंबाचा रस - 2 टेस्पून

कृती

  • सर्वप्रथम मोठ्या आकाराच्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या.
  • यानंतर चाकूच्या सहाय्यानं मिरच्या मधोमध कापून घ्या. मिरच्यांचे दोन भाग करा.
  • आता गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात हळद, तिखट, धनेपूड, आमचूर पावडर, गरम मसाला, जिरेपूड, बेसन, लसूण, लिंबू घाला आणि परतून घ्या. सर्व साहित्य एकजीव करून घ्या.
  • आता तयार केलेल्या मसाल्यामध्ये कापलेल्या मिरच्या घाला.
  • कढईवर झाकण ठेवा आणि मध्यम आचेवर चांगलं शिजू द्या.
  • अशाप्रकारे तुमची मसाला मिरची फाय तयार आहे.

हेही वाचा

  1. घरीच बनवा रेस्टॉरेंट स्टाइल एग्ज 65; तेही फक्त दहा मिनिटांत
  2. सावधान! 'टू मिनट्स नूडल्स' ठरू शकतात घात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.