हैदराबाद Benefits Of Soaked Rice : भारतीयांमध्ये भात हा आहारातील प्रमुख खाद्यपदार्थ आहे. देशातील बहुसंख लोक भाताशिवाय दुसरं काही खातच नाहीत. आशिया आणि जगाच्या पूर्वेकडील देशांमध्ये भात अधिक लोकप्रिय आहे. एकट्या भारतात दरवर्षी सरासरी १२५.०३८ दशलक्ष टन तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. आपल्यापैकी कित्येकांना भात खाणं आवडतं. परंतु भात खाण्या संबंधित काही गैरसमज आहेत. जसं की, भात खाल्ल्यानं वजन वाढतं. दुपारी भात खाल्ल्यास प्रचंड झोप येते. रक्तातील साखरेचं प्रमाण वाढेल या भीतीनं मधुमेही रुग्ण भाताच्या दहा हात दूर राहतात. परंतु भात करण्यापूर्वी तुम्ही काही टिप्स फॉलो केले तर, मधुमेहाचे रुग्ण देखील भात खावू शकतात.
भात करण्यापूर्वी आपण तीनवेळा धुवून लगेच गॅसवर शिजायला ठेवतो. ही पद्धत संपूर्ण चुकीची आहे. भात करण्यापूर्वी थोडावेळ म्हणजे साधारणतः 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजवून ठेवल्यास मधुमेहीच नाही तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक देखील भात खावू शकतील. तांदूळ जास्तवेळ भिजवून शिजवल्यानं त्याचे आरोग्यासंबंधित अनेक फायदे होतात. जेव्हा आपण तांदूळ भिजवतो तेव्हा एन्झाइमॅटिक ब्रेकडाउन होतो. यामुळे नैसर्गिकरित्या कार्बोहायड्रेट्सचे साध्या साखरेत रुपांतर करण्यास मदत होते.
भिजवून भात शिजवल्याचे फायदे खालीलप्रमाणे
रक्तातील साखरेची पातळी : मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त भात खाऊ नये असं अनेक डॉक्टर सांगतात. कारण, तांदळातील ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखरेची पातळी वाढवते. काही डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, तांदूळ धुवून लगेच शिजवण्याऐवजी काही काळ पाण्यात भिजवून ठेवल्यानं ही पातळी कमी होते. यामुळे भातातील साखरेची पातळी वाढण्यापासून रोखली जाते. भात करण्याची ही पद्धत अवलंब केल्यास मधुमेहाचे रुग्ण देखील भात खावू शकतात. यामुळे त्यांना त्रास होत नाही.
पोषक द्रव्य शोषून घेतात : तांदळात अनेक पोषक घटक असतात. जे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. तांदूळ शिजवण्यापूर्वी काही वेळ पाण्यात भिजवून नंतर शिजवून खाल्ल्यानं हे सर्व पोषक घटक शरीरात शोषले जातात.
पचन सुधारते : अनेकांना अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या असतात. ज्या लोकांना अशा समस्या आहेत त्यांनी तांदूळ काही दिवस भिजत ठेवून नंतर शिजवून खाल्ल्यानं फायदा होतो. असं म्हटलं जातं की, अशा प्रकारे भात शिजवल्यानं पचनसंस्थेचं कार्य सुधारतं.
''2018 साली द जर्नल ऑफ फूड इंजिनीअरिंगमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असं आढळून आलं की, तांदूळ बराच वेळ भिजवून नंतर शिजवल्यानं पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. दक्षिण कोरियाच्या सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीचे फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. सुंगमिन ली यांनी हा अभ्यास केला आहे''.
चांगली झोप: तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असते ज्यामुळे झोपेमध्ये व्यत्यय येतो. पण जर तुम्ही तांदूळ जास्त वेळ पाण्यात भिजवून शिजवून खाल्ला तर ग्लायसेमिक इंडेक्स बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शिजलेला भात खाल्ल्यानं रात्री चांगली झोप लागते असं तज्ञांचं म्हणणं आहे.
तासनतास भिजत ठेवू नका - तांदूळ जास्त काळ भिजवून ठेवल्यामुळे त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतात. म्हणून भात करण्यापूर्वी तांदूळ फक्त १० ते १५ मिनिटं भिजत ठेवा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )