fenugreek Hair Pack For Hair Growth: हिवाळा सुरु होताच केसांसंबंधित अनेक समस्या उद्धवतात. केस गळती, कोंडा, केसांची चमक नाहिशी होणे आदी समस्यांचा समाना महिलांनाच नव्हे तर पुरुषांना देखील करावा लागतो. बाजारातील महागडे प्रोडक्टस वापरून देखील या समस्येचे निराकरण होत नाही. परंतु, स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे मेथीचे दाणे केसांसाठी वरदानापेक्षा कमी नाहीत. हे तुम्हाला माहिती आहे काय? आज आम्ही तुमच्याकरिता मेथीपासून तयार करण्यात आलेल्या घरगुती हेअर मास्क पॅक बद्दल माहिती देणार आहोत.
- मेथी आणि दही पॅक: पाच चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी दोन्ही मिश्रण मिक्सरमधून काढून घ्या. तयार झालेल्या मिश्रणानं टाळूची मसाज करा आणि 30 मिनिटं हा हेअर पॅक केसांमध्ये राहू द्या. यानंतर कोमट पाण्यानं केस स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे तुमच्या केसांची वाढ होईल. या हेअर पॅकचा आठवड्यातून दोनदा वापर करा.
- लिंबू आणि मेथी पॅक: चार चमचे मेथीचे दाणे थंड पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर मेथीच्या दाण्यांचा पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये लिंबाचा सर घाला आणि चांगलं मिसळा. आता तुमचा हेअर पॅक तयार आहे. हा हेअर पॅक टाळू आणि केसांना लावून 45 मिनिटं तसंच ठेवा. आता थंड पाण्याने केस स्वच्छ धुऊन काढा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुम्हाला चांगला परिणाम होईल.
- मेथी आणि कोरफड: एका वाटीमध्ये दोन चमचे कोरफड जेल दोन चमचे मेथी घ्या. आता दोन्ही मिक्समधून बारीक करून घ्या. या पेस्टमध्ये एक चमचा मध घाला आणि चांगलं मिसळा. तासभर हा हेअर पॅक केसांवर लावून ठेवा आणि नंतर शॅम्पूने हा धुवून काढा.
- मेथी आणि तांदुळ: एका बॉऊलमध्ये 5 चमचे तांदूळ आणि 3 चमचे मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तासभर केसांना लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं केस धुवा. असं केल्यास तुमचे केस चांगले राहतील.
- मेथी आणि कढीपत्ता: एका भांड्यामध्ये मूठभर मेथीचे दाणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी मेथीदाणे आणि कढीपत्त्याची पेस्ट तयार करा. तयार झालेला हेअर मास्क टाळूला आणि केसांना लावा आणि अर्ध्या तासानं केस थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा हेअर पॅक आठवड्यातून एक किंवा दोनदा वापरा. यामुळे तुम्हाला चांगला फायदा होईल.
- मेथीचे पाणी: वरील सर्व उपाय शक्य नसल्यास तुम्ही आठवड्यातून दोन दिवस केवळ मेथीच्या पाण्यानं केस धुवू शकता. हा उपाय देखील चांगला आहे.
हेही वाचा