ETV Bharat / health-and-lifestyle

उपवासाला 'हे' पदार्थ खाणे ठरेल फायदेशीर, साबुदाणा तर न खालेल्लाच बरा; पाहा काय सांगतात तज्ज्ञ - Fasting Tips from Dietician - FASTING TIPS FROM DIETICIAN

Health tips : उपवासाच्या दिवसांत कोणते पदार्थ खायचे? कोणते पदार्थ खाऊ नये, याबाबत अनेक लोकांच्या मनात संभ्रम असतो. याबाबत आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

Health tips
Health tips (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 1:24 PM IST

नाशिक Health tips : आषाढी एकादशीचा उपवास अनेकजण श्रद्धेने करतात. काही लोकांचे उपवास खूप कडक असतात. तर काही लोक निरंकार उपवास करतात. तर काही लोक उपवासात साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा यांपासून बनवलेल्या पदार्थांचं अधिक प्रमाणात सेवन करतात. मात्र, अनेकांना यामुळे गॅस ऍसिडिटी, डोकं दुखणं, चक्कर येणं, उलटीचा त्रास सतावतो. त्यामुळे उपवासाच्या दिवशी फळे किंवा पचायला हलके उपासाचे पदार्थ आहारात वापरावेत, असं आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितलं.

उपवास करताना लक्षात ठेवा या गोष्टी (Source - ETV Bharat Reporter)

साबुदाणा खिचडी खाणं टाळावं कारण...: महाराष्ट्रात बहुतांश घरात उपास म्हणजे साबुदाणा हे समीकरण रुढ झालं आहे. साबुदाण्याची खिचडी किंवा वडे बनवताना त्यात मीठ, भाजलेले शेंगदाण्याचे कूट, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आदींचा वापर केला जातो. त्यामुळे ती चविष्ट लागते. खाताना छान वाटलेली खिचडी पोटात गेल्यावर मात्र अनेकांना त्याचा त्रास होतो. पचण्यास जड असलेल्या साबुदाणामुळे पित्त वाढते. तसेच साबुदाणा शरीरातील पाणी शोषून घेतो. मग आतडी कोरडी पडते. त्यामुळे मलप्रवृत्ती कडक होणं, पोट फुगणं आणि मळमळ होणं यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे शक्यतो उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाणं टाळावं, असं आहारतज्ज्ञ मीनल शिंपी यांनी सांगितलं.

हलका आहार घ्यावा : उपवासाच्या दिवशी फलाहार करावा. फलाहार म्हणजे फळं, फळांचा रस यासोबतच सुकामेवाचं सेवन करणं. दिवसातून दोन-तीन वेळा फलाहार करावा. तसेच रताळी, राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू किंवा चिक्की, खजूर, दही, ताक हे पदार्थ पचण्यास चांगले असल्यानं पोटाला आराम मिळतो. राजगिरा पचायला हलका असतो. त्यात खनिज, क्षार या मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे राजगिरा खाणं सर्वांसाठी फायदेशीर आहे, असं आहारतज्ज्ञ सांगतात.

चहा आणि कॉफी घेणं टाळावं : उपवासात अनेकजण सतत चहा-कॉफी पितात. मात्र, ते शरीराला हानिकारक आहे. अति चहा-कॉफीमुळे शरीर डिहायड्रेट होण्याची शक्यता असते. याऐवजी भरपूर पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत, ताक,फळांचा रस आदी आहारात असावं. तसेच उपवासाच्या काळात तळलेले पदार्थ खूप खाल्ले जातात. त्याचा परिणाम तब्येतीवर होतो. उपवासात भूक लागल्यास उकडलेले रताळे, सुकामेवा किंवा भुईमुगाच्या शेंगा आधी पदार्थ खावेत, असं आहारतज्ञ सांगतात.

हेही वाचा

  1. आषाढी एकादशी 2024; महाराष्ट्रीयन स्टाईल उपवासाच्या पाच रेसिपी, खास तुमच्यासाठी - Ashadhi Ekadashi Recipes
  2. 'या '5 इनडोअर ॲक्टिव्हिटीजसह मुलांबरोबर पावसाळ्यामध्ये करा धमाल - 5 INDOOR ACTIVITIES FOR KIDS
  3. कांदा खाणं बंद केलं तर शरीरावर काय होऊ शकतो परिणाम? काय आहे आरोग्य तज्ञांचं मत? - Stop Eating Onion
  4. पावसाळ्यात प्या आरोग्यदायी पेय, राहा निरोगी - Healthy drinks

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.