नाशिक Face Yoga : प्रत्येकाला सुंदर दिसण्याची इच्छा असते. सौंदर्य केवळ मेकअप आणि कपड्यांमधूनच येत नाही तर यासाठी त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसणं देखील महत्वाचं असतं.
चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि टवटवीत राहावी यासाठी विविध सौंदर्यप्रसाधनं वापरली जातात. अनेकांकडून यासाठी बराच खर्चही केला जातो. पण आता फेस योगा हा नियमित केल्यानं तुमचा चेहरा अधिक काळासाठी टवटवीत राहण्यासोबत चेहऱ्यावर येणाऱ्या सुरकुत्या कमी होण्यास मदत मिळते, असं फेस योगा प्रशिक्षक भूपाली देवरे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सागितलं.
'फेस योगा'चा सराव महत्त्वाचा-आपला चेहरा ही आपली ओळख असते. मात्र अनेकजण निरोगी जीवनशैलीचा विचार करत नाहीत. बरेच लोक शारीरिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात. मात्र सर्वांगीण दृष्टिकोणातून विचार केल्यास संपूर्ण निरोगीपणासाठी शरीर आणि चेहरा दोन्हींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे संतुलन साधण्याचा एक मार्ग म्हणजे नियमितपणं 'फेस योगा'चा सराव करणं आहे. फेस योगा नियमित केल्यानं त्वचा तजेलदार आणि चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
चेहऱ्यावरील ताण-तणाव कमी होतो. फेस योगामध्ये समाविष्ट असलेल्या हालचाली चेहऱ्यावरील रक्त प्रवाह सुरळीत करतात. त्यामुळे त्वचेला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. त्याचच परिणाम म्हणून चेहऱ्यावरील चमक वाढते.
फेस योगा म्हणजे काय? : "फेस योगा म्हणजे चेहरा आणि मानेवरील स्नायूंसाठी विशिष्ट शास्त्रीय पद्धतीनं नियमित व्यायाम करून तुमच्या चेहऱ्याची सुंदरता व टवटवीतपणा वाढवण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. चेहरा आणि मानेवरील स्नायूंच्या विशिष्ट हालचाली आणि स्ट्रेच करून तुम्ही रक्ताभिसरण क्रिया सुधारू शकता. यात सातत्य ठेवलं तर तुम्ही दिवसेंदिवस अधिक तरुण आणि तेजस्वी दिसू शकता.
फेस योगा हे आरोग्य आणि निरोगीपणा देण्यासाठी एक उपयुक्त आणि परिणामकारक माध्यम आहे. त्याचबरोबर सर्वागाण दृष्टिकोनातन स्वतःची काळजी घेण्यासाठी तसेच निरोगीपणा प्राप्त करण्यासाठी शरीर आणि मन दोन्हीची काळजी घेणं महत्वाचं आहे. त्यासाठी आजच्या ताण-तणावाच्या जीवनात फेस योगा हे अत्यंत गरजेचं आहे," असं फेस योगा प्रशिक्षक भूपाली देवरे यांनी सांगितलं.
हेही वाचा