ETV Bharat / health-and-lifestyle

ड्रॅगन फ्रुटचे 'हे' आहेत ८ आरोग्यदायी फायदे; आवर्जून आहारात करा समावेश - Benefits Of Eating Dragon Fruit - BENEFITS OF EATING DRAGON FRUIT

Benefits Of Eating Dragon Fruit: ड्रॅगन फ्रुट ऊर्जा समृद्ध फळ आहे. एका फळामध्ये 102 कॅलरी ऊर्जा असते. तसंच 22 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. तसंच बियांमध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 9 अ‍ॅसिड असतात. त्यामुळे ड्रॅगन फ्रुट दररोज सेवन केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता.

Benefits Of Eating Dragon Fruit
ड्रॅगन फ्रुटचे फायदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 26, 2024, 5:27 PM IST

Updated : Aug 26, 2024, 5:43 PM IST

हैदराबाद Benefits Of Eating Dragon Fruit : ड्रॅगन फ्रुटमध्ये आरोग्यास पोषक असणाऱ्या कित्येक घटकांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये ड्रॅगन फ्रुटचा आवर्जून समावेश करावा. ड्रॅगन फ्रुट प्रोटीन, कार्ब्स, फायबर तसंच मॅग्नेशियम यासारख्या पोषक घटकांनी परिपूर्ण आहे. याशिवाय या फळामध्ये व्हिटॅमिन सी, ई यासारखे अ‍ॅंटीऑक्सिडंट्सदेखील असतात. याला सुपरफूड देखील म्हणतात.

ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे

  • रोग प्रतिकारशक्ती वाढते : ड्रॅगन फ्रुटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. यामुळे ड्रॅगन फ्रुट रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ड्रगन फ्रूटचं नियमित सेवन केल्यानं शरीर बळकट होण्यास मदत होते. आपल्या नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रुटचा समावेश केल्यास सर्दी- खोकला या आजारापासून संरक्षण होण्यास मदत मिळू शकते.
  • पाचक आरोग्य सुधारते : ड्रॅगन फ्रुटमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आढळून येतात. यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहण्यास मदत मिळते. तसंच बद्धकोष्ठतासारखे आजार टाळण्यास देखील मदत होवू शकते. ड्रॅगन फ्रुट खाल्यानं वारंवार भूक लागत नाही. वजन नियंत्रित करण्यास हे फळ फायदेशीर आहे.
  • मधुमेह व्यवस्थापन : ड्रॅगन फ्रुट रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. यामध्ये झफ्लाव्होनॉइड्स एस्कॉर्बिक अ‍ॅसिड, फेनोलिक अ‍ॅसिड आणि फायबर असतात. त्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित होण्यास मदत होते. मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ड्रगन फ्रुट फार उपयुक्त आहे. हे फळ मधुमेहींच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवते.
  • हृदयाचे आरोग्य : फळातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. या फळाचं नियमित सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका कमी असतो. फूड अ‍ॅंड फंक्शनल फूड्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या माहितीनुसार ड्रॅगन फ्रुट हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. हा अभ्यास डॉ. प. झोऊ आणि झेड. वाय. लिन (डॉ. डब्ल्यू. झाऊ, झेडवाय लिन) यांनी केला.
  • कोलेस्टेरॉल नियंत्रित : शरीरातील वाढलेलं कॉलेस्टॉल हे अनेक आजारांचे कारण ठरु शकते. निरोगी राहायचं असेल तसंच शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवायंच असेल तर आवर्जून ड्रॅगन फ्रुट खावं.
  • व्हायरल आजारांवर रामबाण : डेंगी, मलेरिया, कावीळ, आणि इक व्हायरल आजार झाल्यास ड्रॅगन फ्रुट अत्यंत फायदेशीर ठरतं. शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्यास आवर्जून हे फळ खावं, अस आहार तज्ज्ञ सांगतात.
  • हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढते : ड्रॅगन फ्रुटमध्ये लोहाचे अधिक प्रमाण असते. त्यामुळे हे फळ खाल्यानं शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून निघू शकते. शिवाय ड्रॅगन फ्रुट खाल्यानं अशक्तपणा दूर होतो.
  • भरपूर कॅल्शियम : ड्रॅगन फ्रुटमध्ये कॅल्शियम भरपूर असतं. हाडांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कॅल्शियम कमतरतेनं होणारा ऑस्टिओपोरोसिस टाळण्यास मदत होते. कॅल्शियम युक्त ड्रॅगन फळ हाडांची घनता आणि संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी विशेषतः फायदेशीर आहे.

अधिक माहितीकरिता खाली देलेल्या लिंक वर क्लिक करा

https://krishi.icar.gov.in/jspui/bitstream/123456789/68022/1/Dragon%20Fruit.pdf

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. यकृत निरोगी ठेवायचं? मग 'या' पदार्थांचा करा आहारात समावेश, यकृत राहील ठणठणीत! - Best Fruits For Your Liver
  2. हळद खाणे किती सुरक्षित? आयुर्वेद काय सांगतो, जाणून घ्या फायदे आणि तोटे - Benefits of Turmeric

Last Updated : Aug 26, 2024, 5:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.