मुंबई : महान तबलावादक अल्ला राखा यांचा मोठा मुलगा उस्ताद झाकीर हुसैननं आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भारतात आणि जगभरात नाव कमावले आहे. दरम्यान झाकीर हुसैन यांचं हृदयाशी संबंधित आजारामुळे निधन झाल्याचं समजत आहे. त्यांना काही दिवसापूर्वी त्याच्या तब्येतीमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचे सॅन फ्रान्सिस्को, यूएसए येथे रविवारी उपचारादरम्यान निधन झालं. गेल्या 2 आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्याचे वय 73 वर्षांचे होते. झाकीर हुसैन यांच्या निधनाच्या बातमीला यांच्या कुटुंबीयांनी दुजोरा दिला आहे. आता त्याच्या मृत्यूमुळे देशभरात शोककळा पसरली आहे. दरम्यान चित्रपटसृष्टीतील स्टार्सनं देखील त्यांना आता पोस्टच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे. झाकीर हुसैन हे जगातील महान तबला वादकांपैकी एक होते. झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर सोनू निगम ते अमिताभ बच्चनपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
T 5224 - .. a very sad day ..😥
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 15, 2024
अमिताभ बच्चन यांची पोस्ट : अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, "टी 5224 - ..एक दु:खद दिवस.' यानंतर त्यांनी त्याच्या ब्लॉगमध्ये झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली देत लिहिलं, 'एक प्रतिभाशाली, एक उत्तम उस्ताद, एक मोठ नुकसान, झाकीर हुसैन आपल्याला सोडून गेले.'
सोनू निगम : गायक सोनू निगमनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर पोस्टमध्ये लिहिलं, 'झाकीर भाई हे काय आहे.' यानंतर त्यानं पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'रेस्ट इन पीस उस्ताद' लिहिलं. आता सोनूच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन झाकीर हुसेन यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त करत आहेत.
Can’t wrap my head around the news. I’m in pain. Sending love and strength to all his admirers during this difficult time. May we find comfort in his legacy and the joy he brought to our lives. 🙏💔#zakirhussain #RIP pic.twitter.com/eF79mMDw0a
— Anup Jalota (@anupjalota) December 15, 2024
अनुप जलोटा यांची पोस्ट : भजन सम्राट अनूप जलोटा यांनी व्हिडिओ शेअर करून उस्ताद झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुप जलोटा यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं की, "संगीत जगताचे मोठे नुकसान, उस्ताद झाकीर हुसैन आता राहिले नाहीत. दोन तासांपूर्वी मला कळले की, त्यांची तब्येत खराब झाली असून अवस्था गंभीर आहे. त्यांच्या जाण्यानं मला खूप दुःख झालंय. संपूर्ण जगाला देखील वाईट वाटत आहे. ते देशाचे अभिमान आहे, तसेच तबल्याचा उल्लेख जेव्हाही होतो, तेव्हा भारताला त्यांच्या नावाने ओळखले जाते. मी प्रार्थना करतो, की त्यांना ईश्वर चरणी स्थान मिळावं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला या दुःखाशी लढण्याची शक्ती मिळावी."
Inna lillahi wa inna ilayhi raji'un.
— A.R.Rahman (@arrahman) December 16, 2024
Zakir Bhai was an inspiration, a towering personality who elevated the tabla to global acclaim 🌟🌍. His loss is immeasurable for all of us. I regret not being able to collaborate with him as much as we did decades ago, though we had planned…
एआर रहमान : दिग्गज संगीकार एआर रहमान यांनी त्याच्या पोस्टमध्ये श्रद्धांजली देत लिहिलं, 'झाकीर भाई हे एक प्रेरणास्थान होते, एक उत्तुंग व्यक्तिमत्व होते, ज्यांनी तबल्याला जागतिक ख्याती मिळवून दिली. त्याचे असं जाणं हे नुकसान आहे. त्याच्याबरोबर आम्ही काही दशकांपासून सहकार्य करू शकलो नाही, याचा मला खेद वाटतो, आम्ही एकत्र अल्बमची योजना केली होती. तुमची खरोखरच आठवण येईल. त्यांचे कुटुंब आणि जगभरातील असंख्य विद्यार्थ्यांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो.'
The irreparable loss of Zakir Hussain Sahab is a devastating blow to India and the global music community.
— Riteish Deshmukh (@Riteishd) December 15, 2024
Sir, Your music was a gift, a treasure that will continue to inspire and uplift generations to come.
Your legacy will live on. May your soul rest in eternal glory,… pic.twitter.com/UtH8OUKKtX
रितेश देशमुख : रितेश देशमुखनं देखील झाकीर हुसेन यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रितेशनं त्याच्या पोस्टवर लिहिलं, "झाकीर हुसैन साहब यांचं कधीही भरून न येणारे नुकसान भारतासाठी आणि जागतिक संगीत समुदायाला खूप मोठा धक्का आहे. सर, तुमचं संगीत ही एक देणगी आणि खजिना आहे, जो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुमचा वारसा हा सदैव जिवंत राहील. महान झाकीर हुसैन साहब यांच्या कुटुंबियांना आणि प्रियजनांप्रती संवेदना." दरम्यान झाकीर हुसैन यांना करीना कपूर, रणवीर सिंग, मलायका अरोरा सोनाली बेंद्रे, झोया अख्तर, मनोज बाजपेयी हंसल मेहता आणि इतर स्टार्सनं श्रद्धांजली वाहिली आहे.
झाकीर हुसैन यांच कुटुंब : झाकीर हुसैन यांनी त्यांच्या अनोख्या संगीत प्रवासामध्ये एक अभूतपूर्व वारसा सोडला आहे. यांच्या पश्चात त्यांची पत्नी अँटोनिया मिनेकोला, दोन मुली अनिसा कुरेशी आणि इसाबेला कुरेशी आहेत. याशिवाय त्यांचे भाऊ तौफिक, फजल कुरेशी आणि बहीण खुर्शीद हे त्यांच्या कुटुंबात आहेत. झाकीर हुसेन यांना महान तबलावादक मानले जाते. त्यांचे भारतातील महान शास्त्रीय संगीतकारांमध्ये स्थान आहे.
पुरस्कार आणि योगदान : झाकीर हुसैन यांना त्यांच्या संगीत योगदानासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण यांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी आपल्या कारकिर्दीत पाच वेळा ग्रॅमी पुरस्कारही जिंकला आहे. झाकीर हुसैन त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. त्यांचे वडील, उस्ताद अल्लाह राखा कुरेशी हे देखील एख उत्तम तबला वादक होते. याशिवाय त्यांच्या आईचं नाव बीवी बेगम होतं.