ETV Bharat / entertainment

विमानाचे अपहरण करण्यांना धूळ चारण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा सज्ज, योद्धाचा टीझर रिलीज - Disha Patani

Yodha Teaser: योद्धा चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठ्या अपेक्षेने चित्रपटाचा टीझर लॉन्च केला. सिद्धार्थ मल्होत्रा मुख्या भूमिका करत असलेल्या या अ‍ॅक्शन थ्रिलरचे सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा हे दिग्दर्शक आहेत. दिशा पटानी आणि राशी खन्ना यांच्याही यात प्रमुख भूमिका असलेला योद्धा 15 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Yodha Teaser:
योद्धा टीझर रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 1:53 PM IST

मुंबई - Yodha Teaser: सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी 'योद्धा' चित्रपटाची प्रतीक्षा सुरू असताना निर्मात्यांनी चित्रपटाचा पहिला टीझर जारी केला आहे. 'शेरशाह' चित्रपट आणि 'इंडियन पोलीस फोर्स' या मालिकेतल्या त्याच्या भूमिकांनंतर सिद्धार्थ मल्होत्रा करण जोहरची निर्मिती असलेल्या या आगामी चित्रपटात पुन्हा एकदा पडद्यावर गणवेश परिधान करण्यासाठी सज्ज झाला आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सिद्धार्थ हा किडनॅपर्सना आवर घालण्यासाठी एका सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'योद्धा' चित्रपट अ‍ॅक्शन आणि देशभक्तीने भरलेला असेल, असे टीझररवरुन दिसत आहे. यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. 'योद्धा'ची कथा प्रवासी विमानाचे अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांभोवती केंद्रित आहे आणि त्यात सिद्धार्थने ऑफ-ड्युटी सैनिकाची भूमिका साकारली आहे. तो प्रवाशांना वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावून लढतो.

सिद्धार्थने याआधी 'योद्धा'बद्दल आपले विचार व्यक्त करताना सांगितले होते की, "एक कलाकार म्हणून, तुम्ही नेहमी तुम्ही चमकू शकाल अशा स्क्रिप्ट्स शोधता असता. या चित्रपटामुळे माझी एक नवीन बाजू समोर आली आहे, ज्यासाठी मी मनापासून आभारी आहे. प्रेक्षक आणि चाहत्यांचे उदंड प्रेम आहे. 'योद्धा' त्यांच्यासाठी काय देणार आहे ते उघड करण्यास मी खूप उत्सुक आहे."

करण जोहरनेही 'योद्धा' चित्रपटाचे वर्णन एक आकर्षक अ‍ॅक्शन थ्रिलर म्हणून केले आहे. मुख्य भूमिकेत सिद्धार्थच्या कास्टिंगबद्दल, जोहरने म्हटले की, "सिदने अ‍ॅक्शन हिरोचे रूप उत्तम प्रकारे साकारले आहे. योद्धामध्ये त्याने आधुनिक काळातील अ‍ॅक्शन हिरोची भूमिका पूर्णपणे स्वीकारली आहे."

या चित्रपटात सिद्धार्थशिवाय दिशा पटानी आणि राशी खन्ना यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 11 नोव्हेंबर 2022 रोजी रिलीज होणार होता, शेवटी 15 मार्च 2024 रोजी सेटल होण्यापूर्वी चित्रपटाची रिलीज तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली होती.आता हा चित्रपट अखेर 15 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

हेही वाचा -

  1. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाचा विजय; सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव
  2. 'दंगल गर्ल' सुहानी भटनागरच्या आईनं केला आमिर खानशी असलेल्या नात्याचा खुलासा
  3. 'बाफ्टा 2024' चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'ओपनहायमर'चं वर्चस्व

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.