ETV Bharat / entertainment

कार्तिक आर्यन आणि करण जोहरचा 'दोस्ताना 2' का बंद झाला, आता समोर आलं खरं कारण - Dostana 2 - DOSTANA 2

Dostana 2 : कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर, करण जोहरचा चित्रपट 'दोस्ताना 2' चे शूटिंग सुरू होते. मात्र अचानक या चित्रपटातून कार्तिक बाहेर पडला. त्यानंतर करण जोहरवर त्याला चित्रपटातून काढून टाकल्याचा आरोप होऊ लागला. या पार्श्वभूमीवर जान्हवीनं यावर भाष्य केल्यामुळे हा चित्रपट स्थगित होण्याचं कारण स्पष्ट झालं आहे.

Karthik Aaryan and Karan Joha
कार्तिक आर्यन आणि करण जोहर (IANS)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 7:28 PM IST

मुंबई - Dostana 2 : करण जोहरनं त्याचा महत्त्वकांक्षी चित्रपट 'दोस्ताना 2' हा चित्रपट कार्तिक आर्यनबरोबर करण्याचं ठरवलं होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी हा चित्रपट करणं बंद केलं. कार्तिक आणि करणमध्ये बिनसल्याच्या चर्चा यामुळे सुरू झाल्या होत्या. आता 'दोस्ताना 2' चित्रपट बंद होण्याचे खरे कारण आता समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने 'दोस्ताना 2' बंद होण्यामागचे कारण उघड केले आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत होते. 'दोस्ताना 2' मधून कार्तिक आर्यन बाहेर पडल्यानंतर हा चित्रपट लॉक झाला होता. इथून कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनी करण जोहरवर नेपोटिझमचा आरोप करत त्याला खूप ट्रोल केलं होतं.

दोस्ताना 2 का बंद झाला? जान्हवीचा खुलासा

'दोस्ताना 2' मध्ये कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर आणि लक्ष्य लालवानी यांना कास्ट केलं होतं. एका मुलाखतीत जान्हवी कपूरनं 'दोस्ताना 2' बंद झाल्याबद्दल सांगितलं आहे. जान्हवी म्हणाली की, "मला माहित नाही काय झालं. आम्ही 30 ते 35 दिवस शूट केलं होतं. माझ्या समजुतीनुसार सर्व काही ठीक चाललं होतं. पण चित्रपट का थांबला हे मला माहित नाही, मी पण विचारले होते. लॉकडाऊनच्या आधी चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं, नंतर कोविड आला, त्यानंतर चित्रपटाला उशीर झाला आणि दीड वर्ष लागली, त्यानंतर लोकांना वाटलं की चित्रपट पुन्हा सुरू होईल, पण मला माहित नाही काय झाले?"

करण आणि कार्तिकच्या मतभेदावर जान्हवी काय म्हणाली?

त्याचवेळी जान्हवी कपूरला या मुलाखतीत करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यातील कथित वादाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा अभिनेत्री जान्हवी म्हणाली, "असे काही घडले आहे असे मला वाटत नाही, या दोघांसाठी काम महत्त्वाचे आहे असे मी मानते, पण या दोघांमध्ये काय झाले किंवा नाही हे मला माहित नाही, हे फक्त त्यांना विचारा.

या उत्तरांमध्ये जान्हवीच्या संकोचातून काहीतरी नक्कीच घडल्याचे स्पष्ट होते. जान्हवी कपूर सध्या तिच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटामुळे चर्चेत आहे आणि हा चित्रपट ३१ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

  1. प्रथमेश परब आणि अंकिता लांडे जोडीच्या 'होय महाराजा' ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद! - Hoy Maharaja
  2. सिद्धार्थ मल्होत्रा ​​मतदान करण्यासाठी दिल्लीत दाखल, ईशा गुप्तानं केलं मतदान - Lok Sabha Election 202
  3. करण जोहरचा ५२ वा वाढदिवस : बॉलिवूड स्टार घडवणाऱ्या करणचे आगामी प्रोजेक्ट आणि टॉप 5 चित्रपट - Karan Johars Birthday

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.