ETV Bharat / entertainment

खऱ्या आयुष्यात 'स्त्री' लग्न कधी करणार? यावर श्रद्धा कपूरनं दिलं मिश्किल उत्तर - Shraddha Kapoor Marriage Plan - SHRADDHA KAPOOR MARRIAGE PLAN

Shraddha Kapoor Marriage Plan : श्रद्धा कपूर आणि लेखक राहुल मोदी यांच्यात रोमान्स सुरू असल्याच्या चर्चा होत असताना याच विषयावर तिला 'स्त्री 2' ट्रेलर लॉन्च दरम्यान छेडण्यात आलं होतं. यावेळी श्रद्धानं हुशारीनं उत्तर देऊन हजर जबाबीपणाचं प्रदर्शन केलं होतं.

Shraddha Kapoor Marriage Plan
श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor's Quirky Response to Marriage Plans (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 19, 2024, 5:04 PM IST

मुंबई - Shraddha Kapoor Marriage Plan : गुरुवारी मुंबईत पार पडलेल्या 'स्त्री 2' या फॉलॅक्चर ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात श्रद्धा कपूरनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी तिनं आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली आणि आपल्या हजरजबाबी उत्तरानं प्रेक्षकांची मनं जिंकली.

या कार्यक्रमादरम्यान श्रद्धा कपूर लाल साडी नेसून अगदी नव्या नवीसारखी सजून आली होती. यावेळी तिला स्क्रिप्ट रायटर राहुल मोदीच्या तिच्या नात्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला, दोघांच्या नात्याबद्दल अनेक काळापसून फिल्म इंडस्ट्रीमध्ये चर्चा आहे. विचारण्यात आलं की, "तू 'स्त्री'मध्ये नवरी सारखी दिसत आहेस. खऱ्या आयुष्यात तू कधी नवरी होणार?"प्रश्नाला हुशारीनं बगल देताना ती म्हणाली की, "ती स्त्री आहे, जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती नवरी होईल." या खेळकर आत्मविश्वासपूर्ण उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor's Quirky Response to Marriage Plans (ANI))

जूनमध्ये श्रद्धाने राहुल मोदींबद्दल इंस्टाग्रामवर एक सेल्फी शेअर करून तिच्या नातेसंबंधाला एक प्रकारे दुजोरा दिला होता. फोटोच्या कॅप्शनमध्ये "दिल रखले, निंद तो वापस दे यार," असं म्हटलं होतं.

'स्त्री 2' ट्रेलर लॉन्च प्रसंगी श्रद्धा कपूर सुंदर लाल साडीमध्ये केसात गजरा माळून आली होती. या कार्यक्रमात राजकुमार राव, अभिषेक बॅनरर्जी आणि अपार खुराना आणि 'स्त्री 2 'चे कलाकार एकत्र आले होते. अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे निर्मित हा चित्रपट जिओ स्टुडिओ आणि मॅडॉक फिल्म्स प्रस्तुत करत आहेत.

'स्त्री २' चा ट्रेलर चंदेरी शहराला सतावत असलेल्या नवीन दहशतीमध्ये डोकावणारा आहे. 'सरकट्या' या नवीन प्रतिस्पर्ध्याची ओळख यामध्ये प्रेक्षकांना करुन देण्यात आली आहे. 2018 च्या ब्लॉकबस्टर 'स्त्री' चित्रपटाचा सिक्वेल 15 ऑगस्ट रोजी पडद्यावर येण्यासाठी सज्ज आहे. प्रेक्षक याची प्रतीक्षा आतुरतेनं करत आहेत.

हेही वाचा -

  1. 'स्त्री 2' ट्रेलर मध्ये दिसली 'सरकटा'ची दहशत, गावातील स्त्रीयांच्या जीवाला धोका - Stree 2 Trailer
  2. राहुल मोदीनं चोरलं श्रद्धा कपूरचं हृदय? शक्ती कपूरच्या मुलीची 'उडलीय' झोप!! - Shraddha Kapoor
  3. श्रद्धा कपूरनं लखनौमध्ये चाहत्यांना मिठी मारून घेतली भेट, सोशल मीडियावर नेटिझन्सनं केलं कौतुक - shraddha kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.