ETV Bharat / entertainment

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगनंतर रजनीकांतने घेतला निरोप, इव्हेन्टचे केले कौतुक - अंबानी आणि राधिका मर्चंट प्रीवेडिंग

जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्रीवेडिंग सेलिब्रेशनमध्ये सहभागी झालेला अभिनेता रजनीकांत आता चेन्नईला परतला आहे. शहराचा निरोप घेताना त्याचा व्हिडिओ पापाराझींनी चित्रीत केला आहे.

Anant Radhika PreWedding
प्री-वेडिंगनंतर रजनीकांतने घेतला निरोप
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 6:51 PM IST

मुंबई - सुपरस्टार रजनीकांतने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनला हजेरी लावल्यानंतर गुजरातच्या जामनगरचा निरोप घेतला. सोशल मीडियावर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये अभिनेता रजनीकांत पांढऱ्या पोशाखात शहरातून निघताना दिसत आहे.

अनंत-राधिका प्री-वेडिंग

माध्यमांशी संवाद साधताना रजनीकांत यांनी नीता आणि मुकेश अंबानी यांनी लग्नाआधीच्या कार्यक्रमांचे आयोजन कसे केले याबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त केले. अंबानींनी लग्नाआधीचे कार्यक्रम ज्या पद्धतीने केले ते 'मंत्रमुग्ध करणारे' होते, अशी कमेंटही त्यांनी केली. "त्यांनी कैलास आणि 'वैकुंठ' या जगात आणले. अनंत आणि राधिका यांना मी खूप आनंदी वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा देतो," असे तो म्हणाला.

रजनीकांत, त्यांच्या कुटुंबासह, रविवारी हा सोहळा साजरा केला. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी त्याने शुभ्र वस्त्रे परिधान केली होती. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा तीन दिवसीय विवाहपूर्व उत्सव शुक्रवारी सुरू झाला.

रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटसोबत त्यांचा मुलगा अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटची माहिती दिली. कला आणि संस्कृतीचे महत्त्व पटवून देताना तिने सांगितले की, "माझ्या संपूर्ण आयुष्यात मला कला आणि संस्कृतीने प्रेरणा दिली आहे. यामुळे मला खूप भावले आहे आणि मी त्याबद्दल खूप उत्कट आहे."

आपल्या मुलाच्या लग्ना आधीचा सोहळा साजरा करण्यासाठी अंबानी कुटुंबियांनी जामनगरची निवड केली. या शहरावर त्यांचे विशेष प्रेम आहे. याच शहरात मुकेश अंबानी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली होती. याचे महत्तव लक्षात घेऊन त्यांनी हा भव्य सोहळा मुंबई आवजी जामनगरमध्ये आयोजित केला होता.

दरम्यान, रजनीकांतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर तो टीजे ज्ञानवेलच्या वेट्टायनच्या शूटिंगमध्ये गुंतला आहेय या चित्रपटात अमिताभ बच्चन, फहद फासिल, दुशारा विजयन आणि रितिका सिंग या कलाकारांचा समावेश आहे. साजिद नाडियादवाला निर्मित हा चित्रपट 2024 च्या उत्तरार्धात रिलीज होणार आहे.

हेही वाचा -

  1. गोदा पट्ट्याचा वाघ आता दिसणार मोठ्या पडद्यावर; मनोज जरांगे पाटलांचा जीवनपट 'संघर्षयोद्धा'चं टिझर लाँच
  2. क्रिकेट सेलिब्रिटी लीगमध्ये मुंबई हिरोजनं भोजपुरी दबंग्सवर केली मात
  3. क्रिकेट सेलिब्रिटी लीगमध्ये मुंबई हिरोजनं भोजपुरी दबंग्सवर केली मात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.