ETV Bharat / entertainment

दीपिका पदुकोणचं नातेवाईकांबरोबर डिनर गेट टूगेदर, बॅटमिंटनपट्टू लक्ष्य सेनबरोबर झाली स्पॉट - Deepika Padukone - DEEPIKA PADUKONE

Deepika padukone : दीपिका पदुकोण तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांमध्ये पती रणवीर सिंगच्या कुटुंबाबरोबर म्हणजे स्वतःच्या सासरच्या मंडळींबरोबर डिनरला काल रात्री 20 ऑगस्ट रोजी गेली होती. यावेळी तिच्याबरोबर बॅटमिंटनपट्टू लक्ष्य सेनदेखील दिसला.

Deepika padukone
दीपिका पदुकोण (Deepika Padukone Enjoys Dinner with In-Laws as September Due Date Approaches (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 21, 2024, 11:24 AM IST

मुंबई -Deepika padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहेत. दीपिका सप्टेंबरमध्ये तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. वर्क फ्रंटमधून थोडा पॉज घेतल्यानंतर, दीपिका आता पूर्ण वेळ स्वत:ला देत आहे. अलीकडेच दीपिका तिच्या सासरच्या मंडळींबरोबर म्हणजे कुटुंबाबरोबर डिनर डेटवर गेली होती. यावेळी दीपिका पदुकोण ब्लॅक आउटफिटमध्ये होती. दीपिका आणि तिच्या कुटुंबीयांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता अनेकांना तिचे व्हिडिओ आवडत आहेत. यावेळी दीपिकाबरोबर बॅटमिंटनपट्टू लक्ष्य सेन देखील दिसला.

दीपिका फॅमिलीबरोबर गेली डिनरला : दीपिका पदुकोण तिच्या प्रेग्नंसी टप्प्याचा आनंद घेत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती कारमधून उतरून सासूच्या मागे चालताना दिसत आहे. ती न थांबता थेट रेस्टॉरंटच्या दिशेने गेली. रेस्टॉरंटमध्ये जात असताना तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याशिवाय तिचा लक्ष्य सेनबरोबरचादेखील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये लक्ष्य आणि दीपिका एकत्र दिसत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओबद्दल लिहिलं, "बॉलिवूडमधील एकमात्र अभिनेत्री जिनं तिचा बेबी बंप दाखवला नाही." दुसऱ्या एकानं लिहिलं, "दीपिका खूप सुंदर दिसत आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.

लक्ष्य सेनबद्दल : दरम्यान लक्ष्य सेनबद्दल बोलायचं झालं तर त्यानं मागील ऑलिम्पिक 2024 मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या फेरीत त्याला मलेशियाच्या ली जी जियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर लक्ष्यलाही ब्राँझ घरी आणता आलं नाही.

दीपिका पदुकोणचं वर्क फ्रंट : दीपिकाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती शेवटी 'कल्की 2898 एडी' चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात दीपिका पदुकोणनं गरोदर महिलेची भूमिका साकारली होती. 'कल्की 2898 एडी' चित्रपटातील दीपिका पदुकोणची भूमिका तिच्या चाहत्यांना आवडली. वास्तव जीवनात गरोदर असतानाच तिनं चित्रपटात गरोदर स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली. 'कल्की 2898 एडी' चित्रपटात तिच्याबरोबर अमिताभ बच्चन, प्रभास, दिशा पटानी, दुल्कर सलमान, विजय देवराकोंडा, ब्रह्मानंदम आणि इतर कलाकार दिसले होते. आता पुढं ती रोहित शेट्टीचा कॉप युनिव्हर्स चित्रपट 'सिंघम अगेन'मध्ये झळकणार आहे. या चित्रपटात दीपिका 'लेडी सिंघम'ची भूमिका साकारताना दिसेल. 'सिंघम अगेन' चित्रपटामध्ये तिच्याबरोबर अजय देवगण आणि करीना कपूर खान हे स्टार्स देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. ऑलिम्पिक जिंकणाऱ्या मनू भाकरसह सरबज्योत सिंगचे सेलिब्रिटींकडून अभिनंदन, वाचा कोण काय म्हणाले? - Paris Olympics 2024
  2. दीपिका पदुकोण, राम चरणसह भारतीय सेलिब्रिटींनी 'गो फॉर ग्लोरी'साठी केला अ‍ॅथलीट्सचा जयजयकार - Paris Olympics 2024
  3. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.