ETV Bharat / entertainment

मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट : कुटुंबाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा 'भैय्या जी' - Bhaiyya Ji Movie Promotion - BHAIYYA JI MOVIE PROMOTION

Bhaiyya Ji Movie Promotion: अभिनेता मनोज बाजपेयीचा 'भैय्या जी' हा नवीन चित्रपट 24 मे रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यासाठी मनोज बाजपेयी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाटणा येथे पोहोचला असताना त्यानं ईटीव्ही भारतशी खास बातचीत केली आणि चित्रपटाविषयी माहिती दिली.

Manoj Bajpayee
मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 24, 2024, 10:10 AM IST

मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट (Etv Bharat)

पाटणा - Bhaiyya Ji Movie Promotion: अभिनेता मनोज बाजपेयी आपल्या 'भैय्या जी' या नवीन चित्रपटद्वारे चित्रपटसृष्टीत शतक ठोकणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मनोज बाजपेयी पाटण्याला पोहोचला होता. यावेळी त्यानं 'भैय्या जी' चित्रपटाबद्दलची माहिती दिली. 'भैय्या जी' हा एक फुल ऑन अ‍ॅक्शन चित्रपट असून यामध्ये सावत्र भावांमधील प्रेम दाखवण्यात आलं असल्याचं मनोजनं सांगितलं.

'भैय्या जी' चित्रपटात काय खास आहे?: मनोज बाजपेयीला 'भैय्या जी' चित्रपटाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यानं सांगितलं की, या चित्रपटातील भैय्या जीची व्यक्तिरेखा लक्ष वेधणारी आहे. सावत्र आई आणि मुलगा यांच्यातील ही कथा आहे. सावत्र भावांच्या प्रेमाची ही कथा आहे. चित्रपटात, मोठ्या भावानं आपल्या वडिलांना वचन दिलं होतं की जोपर्यंत तो आपल्या सावत्र भाऊ आणि आईच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही तोपर्यंत तो त्याच्या आयुष्यात पुढं जाणार नाही.

'भैया जी' चित्रपटाचा ट्विस्ट: मनोज बाजपेयी यांनी सांगितलं की, चित्रपटात एक वेळ अशी येते जेव्हा मोठ्या भावाला कुटुंबाचे रक्षण करायचं की स्वत:चं रक्षण करायचं असा विचित्र पर्याय असतो. तिथूनच चित्रपटातची संपूर्ण कथा सुरू होते. आता पुढची कथा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जावं, असं मनोज बाजपेयी म्हणाला. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट असून त्यातील बहुतांश अ‍ॅक्शन सीन्स मी स्वत: केले आहेत, जे लोकांना खूप आवडतील, असं तो म्हणाला.

कथा बिहारशी संबंधित आहे का?: या चित्रपटाची कथा बिहारशी संबंधित आहे का, या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाला की, ही कथा कुठूल्याही राज्यातली असू शकते. ही कथा मध्य प्रदेशची असू शकते, उत्तर प्रदेशची असू शकते, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कुठेही सेट होऊ शकते. पण आमच्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची निवड अशी होती की आपण बिहारच्या पार्श्वभूमीवर कथा घेऊ या.

"अनेक वर्षांपासून आपल्या बिहारची धरती आणि माती मुख्य प्रवाहातून हरवत चालली आहे. त्यामुळे बिहारची पार्श्वभूमी आणि बिहारच्या सांस्कृतिक परंपरेशी निगडित लोकांना ते या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हे खूप संस्मरणीय असेल. असं म्हणतात की बिहारच्या मातीशी घट्ट नातं असलेला 'एक बिहारी सौ पर भारी.' मी बिहारमध्ये वाढलो आहे, शुद्ध जेवण जेवलोय, गायी म्हैशींचं दूध पिलंय आणि याचा परिणाम म्हणून मी स्वतःच अ‍ॅक्शन केली आहे." - मनोज बाजपेयी

'भैय्या जी'चे पात्र धोकादायक का आहे?: मनोज बाजपेयीनं सांगितले की, या पात्राची ही कथा असल्यामुळे या चित्रपटाचं नाव 'भैया जी' ठेवण्यात आलं आहे. ट्रेलरमध्ये 'भैय्या जी' खूपच आक्रमक दिसत आहेत, या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाला की, भैय्या जीचे आणखी एक रूप आहे. जेव्हा तो कुटुंबात असतो तेव्हा त्याचा लूक वेगळा असतो. तो कुटुंबासाठी कुठल्याही टोकाला जाऊ शकतो याची अनेक उदाहरण यात पाहायला मिळतील. जेव्हा प्रेक्षक पूर्ण चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना हे दिसेल.

चित्रपटाचा निवडणुकीशी काही संबंध आहे का?: 'शूल' हा चित्रपट 1990 च्या दशकात बिहारच्या पार्श्वभूमीवर बनला होता. 2024 च्या निवडणुकीच्या वेळी 'भैय्या जी' रिलीज होत आहे. ट्रेलरमध्ये सत्ता उलथून टाकण्याची चर्चा आहे, या प्रश्नावर तो म्हणाला की, त्याची कथा 2020 ची देखील असू शकते. ते 2002 मध्ये देखील होऊ शकतं. ही कथा कधीही घडू शकते.

मनोज बाजपेयी राजकारणात उतरणार का? : निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर मनोज बाजपेयी म्हणाला, 'सिनेसृष्टीत तयार झालेल्या मार्गावरुन मी पुढे जात आहे. मी इतकं यश मिळवत आहे, यश सोडून अशा मार्गावर का जायचं ज्याची आपल्याला माहितीही नाही. मी चित्रपटाचा आनंद घेत आहे, ही गल्ली सोडून मी निवडणुकीच्या गल्लीत गेलो तर माझ्यापेक्षा मोठा मूर्ख कोणीही नसेल.

काय म्हणाले ते घराणेशाहीच्या प्रश्नावर? : सिनेविश्वातील घराणेशाहीच्या प्रश्नावर तो म्हणाले की, ही हिंदी चित्रपटसृष्टी आहे, त्यामुळे निर्मिती संस्था कोण चालवत आहे हे उघड आहे. त्याच्या मुलाला अभिनयात यायचं असेल तर त्याला प्रशिक्षण दिलं जातं. मुंबई शहरात माझे कोणीही नाही, पण मी माझ्या कलागुणांना वाव देण्यासाठी इतके कष्ट केले की मी थिएटरमध्ये सहभागी होऊन इथपर्यंत पोहोचलो. गावातून मी मुंबईला नाही तर दिल्लीला गेलो. दिल्लीला जाऊन थिएटर केले आणि थिएटरनंतर स्वत:ला अभिनेता म्हणून प्रस्थापित केलं आणि नंतर मुंबईत स्थान मिळालं.

हेही वाचा -

  1. द्विभाषिक 'मल्हार' चित्रपटातून उलगडणार नात्यांच्या विविध छटा! - Malhar movie
  2. तृप्ती दिमरीनं 'पुष्पा 2'मध्ये सामंथा रुथ प्रभूची घेतली जागा, अल्लू अर्जुनबरोबर करणार डान्स नंबर - tripti dimri and pushpa 2
  3. शाहरुख खानच्या तब्येतीचं अपडेट, 'किंग खान'च्या मॅनेजरचा मेसेज - Shah Rukh Khan health update

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.