ETV Bharat / entertainment

Viral photo : 'पुष्पा 2' च्या गाण्याच्या शूटिंगमधील अल्लू अर्जुन आणि श्रीलीलाचा फोटो लीक - PUSHPA 2 SONG PHOTOS LEAKED

अल्लू अर्जुन आणि श्रीलीलावर 'पुष्पा 2' मध्ये एक गाणं चित्रीत झालंय. गाण्याच्या सेटवरील एक फोटो लिक झाला आहे. हा चित्रपट यावर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

photo of Allu Arjun
अल्लू अर्जून पुष्पा 2 (Pushpa 2 poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 9, 2024, 5:39 PM IST

Updated : Nov 9, 2024, 7:59 PM IST

मुंबई - अल्लू अर्जूनच्या पुष्पा 2 'द रुल'च्या रिलीजबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट देशभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या सेटवरून हा फोटो लीक झाला आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये 'पुष्पा: द राईज' मधील लोकप्रिय गाणं चित्रीत होताना दिसत आहे.

'पुष्पा 2 द रुल'च्या सेटवरील अल्लू अर्जुन आणि श्रीलीला यांचा हा फोटो X वर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये अल्लू अर्जुनने फ्लोरल रेड कलरचा पोशाख परिधान केलेला दिसत आहे. तर श्रीलीला काळ्या आणि सोनेरी रंगाच्या पोशाखात दिसत आहे. यामध्ये तिचा अतिशय इंटेन्स लूक दिसत आहे.

अल्लू अर्जून आणि श्रीलीला दोघेही त्यांच्या डान्स स्टेप्सचा सराव करत असताना हा फोटो क्लिक झाला आहे, याचा अंदाज या फोटोवरून लावता येतो. बॅकग्राउंड डान्सर्स बॅकग्राऊंडमध्ये एकमेकांशी बोलतांना दिसतात. हा फोटो लीक झाल्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला की हा फोटो खरा आहे की मॉर्फ केलेले चित्र आहे.

दरम्यान 'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी 8 नोव्हेंबर रोजी चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल अपडेट दिलं होतं. X वर एक पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, "प्रतीक्षा संपली आहे. सर्वात मोठ्या भारतीय चित्रपटाचा ट्रेलर लॉक करण्यात आला आहे. पुष्पा 2 चा ट्रेलर जाहीर होणार आहे. पुष्पा 2 हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरात भव्य रिलीज होईल."

सुकुमार दिग्दर्शित पुष्पा २ मध्ये अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहद फासिल पुन्हा एकदा झळकणार आहेत. यामध्ये अल्लू अर्जून पुष्पा राज, रश्मिका मंदान्ना ही श्रीवल्ली आणि भंवर सिंग शेखावत या खलनायकी भूमिकेत फहद फसिल दिसणार आहेत. या चित्रपटाच्या सिक्वेलसाठी निर्मात्यांनी अनेक गोष्टींची तयारी केली आहे.

Last Updated : Nov 9, 2024, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.