ETV Bharat / entertainment

विद्या बालननं सांगितला 'दो और दो पांच'च्या शीर्षकाचा किस्सा, फुल्ल टू धमाल कॉमेडी करायची व्यक्त केली इच्छा! - Vidya Balan interview

Vidya Balan exclusive interview : विद्या बालनची भूमिका असलेला 'दो और दो पांच' हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या शीर्षकामागचा किस्सा तिनं ईटीव्ही भारतला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितला आहे. अनेक विषयांवर बोलत असताना तिनं कॉमेडी भूमिका साकारण्याची इच्छादेखील बोलून दाखवली आहे.

Vidya Balan
विद्या बालन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 17, 2024, 9:59 AM IST

मुंबई - Vidya Balan exclusive interview : छोट्या पडद्यावर प्रसिद्धी मिळविल्यावर अनेक कलाकार मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी आतुर असतात. परंतु त्यातील फार म्हणजे फारच कमी जणांना मोठ्या पडद्यावर यश मिळाल्याचं दिसतंय. परंतु एक कलाकार छोट्या पडद्यावर फारसं चांगलं काही करायला मिळत नाही म्हणून मोठ्या पडद्यावर अवतरली आणि आता एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिचं नाव घेतलं जातं, ती म्हणजे विद्या बालन! विद्या बालन आजमितीला तिच्या सशक्त भूमिकांसाठी ओळखली जाते. 'हम पांच' सारख्या लोकप्रिय मालिकेतून मनोरंजनसृष्टीत प्रवेशित झालेली विद्या तिच्या भूमिकेला रास्त वाव मिळत नाही म्हणून मालिका सोडून चक्क घरी बसली. परंतु काही काळातच तिने 'परिणीता' मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आणि नंतर मागे वळून पहिलंच नाही. विद्याच्या नावे एक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, ५ फिल्मफेअर पुरस्कार, ५ स्क्रीन पुरस्कार असून भारत सरकारने तिला पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलं आहे. विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेला 'दो और दो प्यार' नामक एक नवीन सिनेमा येऊ घातलाय. त्यानिमित्ताने आमचे प्रतिनिधी कीर्तीकुमार कदम यांनी विद्या बालन सोबत वार्तालाप केला त्यातील काही अंश.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

याआधी 'दो और दो पांच' नावाचा कॉमेडी सिनेमा येऊन गेलाय. तुमच्या चित्रपटाच्या नावात साधर्म्य आहे. 'दो और दो प्यार' नावाबद्दल काही सांगू शकाल?

'दो और दो चार' होतात. आधीच्या चित्रपटात 'दो और दो पांच' पकडले गेले होते. त्यामुळे 'दो और दो चार की पांच' या कन्फ्युजन वर चित्रपटाचे नाव बेतलेलं आहे. आमच्या चित्रपटात संपूर्ण खेळ 'प्यार' भोवती असल्यामुळे चित्रपटाचे नाव आहे 'दो और दो प्यार'. खरं म्हणजे हा चित्रपट 'लव्हर्स' या आंग्ल भाषिक चित्रपटावरून प्रेरित आहे आणि सुरुवातीला आमच्या या चित्रपटाचे नाव सुद्धा 'लव्हर्स' होते. परंतु हिंदी चित्रपटाला हिंदी नाव जास्त सयुक्तिक वाटेल म्हणून आम्ही चांगल्या हिंदी नावाच्या शोधात होतो. असेच ब्रेन स्टॉर्मिंग करीत असताना मी एक नाव सुचवले आणि विचारले की 'दो और दो प्यार' हे नाव कसे वाटते? अतुल कसबेकर जे निर्माते आहेत त्यांना हे नाव रुचलं आणि ते म्हणाले की, 'हे नाव कथानकाला चपखल बसतंय. बघूया, हे नाव मिळत असेल तर विकत घेऊन टाकू'. कर्मधर्मसंयोगाने ते नाव आम्हाला मिळाले आणि सर्वजण खूष झाले. मला काकणभर जास्तच मस्त आणि अभिमानीत वाटले कारण मी सुचविलेले नाव पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाला दिले गेले आहे.

Vidya Balan
विद्या बालन

हा हॉलिवूड चित्रपट 'लव्हर्स' चा ऑफिशियल रिमेक आहे. यातील तुमची भूमिका तुम्हालाच समोर ठेऊन लिहिली गेली आहे त्याबद्दल काय सांगाल?

'दो और दो प्यार' हा 'लव्हर्स'चा रिमेक असला तरी आम्ही बरेच बदल केले आहेत. त्यातील मूळ भावनिक गाभा पकडून ठेवत कथानकाला रोमँटिक कॉमेडी सदरात बसवलं आहे. तसेच विषयाचे भारतीयीकरण केलं असून इमोशन्सला विनोदाची फोडणी दिली आहे, जेणेकरून विषय क्लिष्ट न होता प्रेक्षकांना भावेल. आणि हो. या चित्रपटाचे कथानक मला समोर ठेऊन लिहिण्यात आलं आहे. त्याचे झाले असे की स्वाती अय्यर माझ्याकडे आली आणि हा कॉन्सेप्ट ऐकवला. त्यानंतर मला लव्हर्स दाखवला गेला. मला कथानक भावले आणि मी चित्रपट करण्यात रस दाखविला. लेखक सुप्रोतिम सेनगुप्ता यांनी चित्रपटाचे कथानक मला समोर ठेऊन लिहीत असल्याचं सांगितलं. त्यांनी आणि स्वातीने सांगितलं की ते चित्रपट 'लाईट' ठेवणार आहेत, एका रॉम-कॉम' सिनेमाप्रमाणे. मलाही ते खूप भावलं कारण मलाही सध्या काही 'इंटेन्स' करायचं नव्हतं. आणि मला जाणवलं होतं की याचे कथानक 'रॉम-कॉम' च्या वाटेने जाऊ शकते. याचे दिग्दर्शन पुरुषोत्तम गुहा आणि शीर्ष गुहा ठाकुरता यांनी केलं आहे. त्यांनी या चित्रपटाला खूप छान ट्रीटमेंट दिली आहे. त्यांनी चित्रित केलेले प्रसंग एकाचवेळी विनोदी आणि भावनिक वाटतील. मानवी रिलेशन्सबद्दल हा सिनेमा खूप छान बोलतो.

तुमच्यात सुंदर व्यक्तिमत्व आणि विनोदी स्वभाव याची उत्तम सांगड आहे. सोशल मीडियावरील तुमचे कॉमिक रील्स खूप व्हायरल होतात. त्याबद्दल काही सांगू शकाल?

मला स्वतःला एक प्रेक्षक म्हणून मारधाड, ऍक्शन, इंटेन्स, सिरीयस बघण्यापेक्षा विनोदी चित्रपट बघायला आवडतात. 'दो और दो प्यार'ची संहिता वाचल्यावरच मी हो म्हटले परंतु त्याला दिलेली 'रॉम-कॉम' ट्रीटमेंट मला जास्त भावली. सोशल मीडियाचे म्हणाल तर सुरुवातीला मी त्यापासून लांबच राहत होते. परंतु माझ्या मॅनेजरनं सांगितले की मी त्यावर ऍक्टिव्ह असले पाहिजे. तिने मला काही रील्स दाखविली ज्यात काही मजेदार व गमतीशीर रील्स होत्या, ज्या मला आवडल्या. मग मी काही विनोदी रील्स बनविली. सुरुवातीला मी महिन्यातून एक दोन रील्स पोस्ट करीत असे.

मी लंडनला 'नियत 'चे शूट करीत होते. शूट संपल्यावर माझ्याकडे खूप रिकामा वेळ असे. एकदा शूटिंगला काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत होता त्यावेळी मी जवळच्या गार्डनमध्ये गेले आणि उस्फुर्तपणे एक रील बनवलं आणि पोस्ट केलं. नंतर मला समजले की त्या रीलला ७० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तेव्हा मात्र मी ठरवलं की वरचेवर रील्स पोस्ट करायची. मी मुख्यत्वे विनोदी रील्स बनविते आणि त्याला मिळणारा प्रतिसाद मला भावतो. (हसत) माझ्याकडे कॉमेडी पिक्चर्स येत नाहीत त्यामुळे कॉमेडी करण्याची भूक मी असे रील्स तयार करून भागवते. मला स्वतःला, भन्नाट, फुल्ल टू धमाल, मॅड कॉमेडी चित्रपट करायचा आहे.

विद्या बालनने तमिळ, हिंदी, मल्याळम, बंगाली आणि मराठी (एक अलबेला) भाषेत चित्रपटांत कामं केली आहेत. तिला चांगल्या संहितेचा मराठी सिनेमा करायचा आहे आणि स्वतःच्या आवाजातच मराठी भाषेत डब देखील करायचा आहे.

हेही वाचा -

  1. शिल्पा शेट्टीनं अष्टमी नवरात्रीला मुलगी समिशाबरोबर केलं कन्यापूजन , व्हिडिओ व्हायरल - Shilpa Shetty
  2. अनुष्का बाळासह भारतात परतली, पापाराझींपासून दूर ठेवला मुलांचा चेहरा - Anushka Sharma
  3. 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर अमुलची क्रिएटिव्ह पोस्ट, परिणीतीनंही दिली दाद - Amar Singh Chamkila

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.