मुंबई - Do Aur Do Pyaar Trailer : शिर्षा गुहा ठाकुर्ता दिग्दर्शित 'दो और दो प्यार' या रोमँटिक कॉमेडी चित्रपटातून विद्या बालन रुपेरी पडद्यावर परतली आहे. आज शनिवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंधील राममूर्ती यांच्याबरोबर विद्या बालन दिसत आहे. खरंतर एका गंभीर विषयावरील हा चित्रपट नातेसंबंधाच्या गुंत्याच्या पार्श्वभूमीवर हलक्या फुलक्या संवादासह आणि मजेशीर प्रसंगासह उलगडत जाणार याची खात्री ट्रेलर पाहताना वाटते. यात विद्या बालन आपला अतिशय सहज आणि नैसर्गिक अभिनय करताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना दोन विवाहित जोडप्यांची एक झलक पाहायला मिळते. यामध्ये ते त्यांच्या संसारात झालेल्या बिघाडीची चर्चा करताना दिसतात. आपला वैवाहिक आनंद परत मिळवण्यासाठी ते मुव्ही डेटिंग आणि एकत्रीत प्रवास करतात. अतिशय खुमासदार प्रसंगातून चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढवण्यात ट्रेलरला यश मिळाल्याचं दिसतं.
इलियाना डिक्रुझसाठी, आई झाल्यानंतरचा हा तिचा दुसरा चित्रपट आहे. ती यापूर्वी 'तेरा क्या होगा लवली'मध्ये रणदीप हुड्डा बरोबर दिसली होती आणि अभिषेक बच्चनस 'द बिग बुल'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या चित्रपटात इलियानाच्या पतीची भूमिका साकारणारा सेंधील प्रामुख्याने पश्चिमात्या चित्रपटातून काम करतो. हिंदीमध्ये तो शेवटचा राज आणि डीकेच्या शोर 'इन द सिटी'मध्ये दिसला होता.
विद्याची शेवटची भूमिका रहस्य-थ्रिलर 'नीयत' या चित्रपटामध्ये होती, आणि ती आगामी काळात कार्तिक आर्यन आणि तृप्ती दिमरी यांच्या भूमिका असलेल्या हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया 3' मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, प्रतीक गांधी, 'फुले' हा महात्मा ज्येतिबा फुलेंच्या जीवनावरील बायोपिक आणि 'देढ बिघा जमीन'च्या रिलीजसाठीची तयारी करत आहेत.
समीर नायर, दीपक सेगल, तनुज गर्ग, अतुल कसबेकर आणि स्वाती अय्यर चावला यांनी बनवलेला 'दो और दो प्यार' चित्रपट 19 एप्रिल 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट वैवाहिक जीवनावर भाष्य घडवून आणणारा आणि विनोदाचे मिश्रण असलेला हृदयस्पर्शी चित्रपट आहे.
हेही वाचा -
3. अजय देवगणनं 'मैदान'च्या रिलीजपूर्वी घेतला क्रिकेटचा आनंद , फोटो व्हायरल - maidaan Movie