मुंबई - Vicky Vidya ka woh wala video : अभिनेता राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर आगामी कॉमेडी चित्रपट 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. या चित्रपटाचं ट्रेलर खूपच मजेदार आहे. 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपटात राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत असून मल्लिका शेरावत, विजय राज, मस्त अली यांसारखे कलाकार सहाय्यक भूमिकेत आहेत. याशिवाय दलेर मेहंदीच्या गाण्यात अभिनेत्री शहनाज गिल स्पेशल अपीयरेंस करणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला विकी आणि विद्या स्वतःचा एक इंटिमेट व्हिडिओ बनतात.
'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ'चा ट्रेलर रिलीज : यानंतर त्यांचा सीडी प्लेयर चोरीला जातो. सीडी प्लेयर शोधण्याच्या धडपडीत विकी आणि विद्या पोलिसांची मदत घेतात. निर्मात्यांनी या ट्रेलरला एक सुंदर कॉमेडी जोडली आहे. या ट्रेलरमध्ये विजय राज हा मल्लिका शेरावतच्या प्रेमात पडलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. अलीकडेच निर्मात्यांनी ट्रेलर रिलीजची घोषणा करतानाचा टीझर देखील पोस्ट केला होता. या मनोरंजक टीझरमध्ये, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी टीव्ही पत्रकारांच्या भूमिकेत दिसत होते. या टीझरमध्ये त्यांच्या चित्रपटातील कलाकार आणि क्रूची ओळख करून देण्यासाठी एक शो ते होस्ट करताना दिसले. हा रिलीज केलेला टीझर अनेकांना आवडला होता.
'या' दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित : 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' चित्रपट टी-सीरीज, बालाजी टेलिफिल्म्स, वाकाओ फिल्म्स आणि थिंकिंग पिक्चर्स यांचा संयुक्त उपक्रम आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 11 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान आलिया भट्ट आणि वेदांग रैना स्टारर 'जिगरा' हा चित्रपट देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, राजकुमार रावचा 'स्त्री 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर श्रद्धा कपूर ही मुख्य भूमिकेत दिसली आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये 'मलिक' हा आहे. दुसरीकडे, तृप्तीचा मागील चित्रपट 'बॅड न्यूज' होता. यामध्ये तिच्याबरोबर विकी कौशल आणि एमी विर्क होते.
हेही वाचा :