ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ नाटककार सुरेश खरेंच्या लेखन कारकीर्दीचा सन्मान, ‘मानाचि’ संघटनेचा ९ वा वर्धापनदिन साजरा - Suresh Khare - SURESH KHARE

मुंबईतील मराठी लेखकांच्या संघटानेने स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळा मुंबईत पार पडला. यामध्ये ज्येष्ठ नाटककार सुरेश खरेंच्या लेखन कारकीर्द सन्मान देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

Veteran playwright Suresh Khare
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरें (Manachi organization)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 5:39 PM IST

मुंबई - ‘लेखकांनी.. लेखकांची.. लेखकांसाठी..’ स्थापन केलेल्या मालिका नाटक चित्रपट लेखक संघटनेच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे बोलत होते. ‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान ! ’असं ज्येष्ठ नाटककार आदरणीय सुरेश खरे यांनी आपल्या लेखन कारकीर्द सन्मानाला उत्तर देताना म्हटलं आहे.

गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, अ‍ॅडड-गुरू भरत दाभोळकर, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांनी सुरेश खरे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मान केला. हा सोहळा दिनांक ६ मे २०२४ रोजी संध्याकाळी, मुंबईतल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडला.

Veteran playwright Suresh Khare
ज्येष्ठ नाटककार सुरेश खरें (Manachi organization)

गंगाराम गवाणकर, सुरेश खरे यांच्या सन्मानार्थ म्हणाले की, ‘माझ्या कारकीर्दीला सुरेश खऱ्यांच्या नाटकाचा बॅकस्टेज वर्कर म्हणून सुरूवात झाली. पुढे सुरेश खरे आणि मी दोघंही नाट्यसंमेलनाचे अध्यक्षही झालो आणि मानाचिच्या लेखन कारकीर्द सन्मानाचे मानकरीही झालो.’

या सन्मान संध्येत, मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी राकेश सारंग, अनिल पवार, अदिती मारणकर, कौस्तुभ देशपांडे, स्वप्निल जाधव, सचिन जाधव, क्षितिज पटवर्धन, नितीन सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्या बरोबरच अन्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय लेखनाबद्दल, नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, गेली पंचवीसहून अधिक वर्ष, ‘अर्थ आणि बँकिंग’ सदर लिहिणारे राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी विजय कदम यांनाही सन्मानित करण्यात आलं. मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश गारगोटे आणि उमेश ओमाशे यांचाही सन्मान करण्यात आला. आशिष पाथरे यांच्या खुसखुशीत निवेदनानं ही सन्मान संध्या रंगली.

त्या पूर्वी, मानाचि लेखक संघटनेनं आयोजित केलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच एकांकिकांचं सादरीकरण झालं. नवीन लेखकांना प्रोत्साहन मिळावं, नवनवीन लेखक लिहिते व्हावेत या उद्देशाने मानाचि गेली नऊ वर्ष विविध शिबिरं, परिसंवाद, आणि मार्गदर्शक चर्चासत्रांचे आयोजन करत आली आहे. त्याच उद्देशाने यंदा उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रभरातून १४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

अंतिम फेरीत संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. तर बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘A tale of Two’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिकं पटकावली.

अ‍ॅड-गुरु भरत दाभोळकर, लेखक आनंद म्हसवेकर, रामनाथ थरवळ, पुरुषोत्तम बेर्डे, विजय टाकळे, राजीव जोशी, होम मिनिस्टरचे लेखक महेंद्र कदम, मानाचिचे अध्यक्ष विवेक आपटे या मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यातील सर्व रोख पारितोषिके मानाचिच्या सभासदांनी आणि सन्मानचिन्हे पितांबरी प्रॉडक्टस प्रा. लि. नी प्रायोजित केली होती.

गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर व शिल्पा नवलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळी उत्स्फूर्त एकांकिका या नाट्यप्रकारचे जनक सुहास कामत, आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर व प्रमोद लिमये यांचा प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

स्पर्धेचा संपूर्ण निकाल पुढीलप्रमाणे,

सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम क्रमांक

(मानाचि आणि रामनाथ थरवळ पुरस्कृत रोख २५,००० हजार रुपये आणि सन्मानचिन्ह )

एकांकिका : एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय क्रमांक

(कवी कै. रामचंद्र विष्णू कोंडेकर स्मरणार्थ डॉ.अलका नाईक पुरस्कृत रोख १५,००० रुपये आणि सन्मानचिन्ह )

एकांकिका: एकांकिका : A Tale of Two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट लेखक : प्रथम क्रमांक

( गंगाराम गवाणकर पुरस्कृत रोख रुपये ११,००० आणि सन्मानाचिन्ह )

कार्तिक बहिरट आणि राज दीक्षित – एकांकिका - A Tale of Two : सादरकर्ते बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट लेखक द्वितीय क्रमांक

(कै. सुरेश नारायण दरेकर स्मरणार्थ सचिन दरेकर पुरस्कृत रोख ९,००० आणि सन्मान चिन्ह)

रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी - एकांकिका :१४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम क्रमांक

(आशिष पाथरे पुरस्कृत रोख ५,००० आणि सन्मानचिन्ह)

रोहित कोतेकर ,रोहन कोतेकर ,केतन साळवी - एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन द्वितीय क्रमांक

(कै. सिंधू औंधे स्मरणार्थ अरविंद औंधे पुरस्कृत रोख ३,००० आणि सन्मानचिन्ह)

कार्तिक बहिरट - एकांकिका :A Tale of Two* - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट कथा विस्तार प्रथम

(सौ. श्वेता पेंडसे पुरस्कृत रोख रु.३,००० व सन्मानचिन्ह)

कार्तिक बहिरट /राज दीक्षित - एकांकिका : A Tale of Two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट कथा विस्तार द्वित्तीय

(लेखक कवी कै.राजा गायंगी स्मरणार्थ शिल्पा गायंगी गंजी पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह)

विनोदी अभिनेता

(कै. पद्माकर तांबे स्मरणार्थ सुनीता तांबे पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह)

राज दीक्षित - एकांकिका : A Tale of two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

विनोदी अभिनेता

(कै. भालचंद्र घाडीगावकर स्मरणार्थ अरुण घाडीगावकर पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह )

अमेय परब - एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम क्रमांक

(कै.याज्ञसेना देशपांडे स्मरणार्थ राजेश देशपांडे पुरस्कृत रोख ३,००० आणि सन्मानचिन्ह)

श्रेयसी वैद्य - एकांकिका - खूप लोक आहेत – सादरकर्ते : अभिनय, कल्याण.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री द्वितीय क्रमांक

(कै. लतिफा काझी स्मरणार्थ खलिदा शेख पुरस्कृत रोख २,००० रुपये आणि सन्मानचिन्ह )

साक्षी पाटील - एकांकिका : Who is the culprit - सादरकर्ते : स्वामी नाट्यांगण ,डोंबिवली

अभिनेता प्रथम क्रमांक

(कै. कुमुदिनी गोविंद आपटे स्मरणार्थ विवेक आपटे पुरस्कृत रोख ३,००० आणि सन्मानचिन्ह.)

रंजन प्रजापती - एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

अभिनेता द्वितीय क्रमांक

(कै. एम एम काझी स्मरणार्थ खलिदा शेख पुरस्कृत रोख २,००० रुपये आणि सन्मानचिन्ह )

रोशन मोरे - एकांकिका : खूप लोक आहेत - सादरकर्ते : अभिनय कल्याण

विशेष लक्षवेधी सादरीकरण - नम्रता कलाविष्कार नाशिक

(प्राथमिक फेरी)

सर्वोत्कृष्ट रंगमंच व्यवस्थापन

(नर्मदा डिझाईन फाउंडेशन तर्फे उमेश ओमाशे पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह)

सादरकर्ते : स्वामी नाट्यांगण - डोंबिवली

सर्वोत्कृष्ट रंगभूषा

(कै. रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह )

कार्तिक बहिरट - एकांकिका : A tale of Two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट वेशभूषा

(मालती यादव आदरार्थ सौ. भावना सोनवणे पुरस्कृत रोख २,०००आणि सन्मानचिन्ह)

मधुरा राऊत आणि रिद्धी टेंबवलकर - एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट संगीत

(सौ. सुलभा चव्हाण पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मानचिन्ह)

शुभम ढेकळे - एकांकिका : १४ इंचाचा वनवास - सादरकर्ते : संहिता क्रिएशन, मुंबई

सर्वोत्कृष्ट नेपथ्य

(शिघ्र नागरी लिपीकार कै. डॉ. वा. भागवत स्मरणार्थ भागवत कुटुंबाकडून रोख २,००० आणि सन्मानचिन्ह )

कार्तिक बहीरट आणि अथर्व ढेबे - एकांकिका: A tale of two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना

(रोहिणी दामोदर सावंत स्मरणार्थ विठ्ठल सावंत पुरस्कृत रोख २,००० आणि सन्मान चिन्ह )

निखिल मारणे - एकांकिका : A Tale of Two - सादरकर्ते : बीएमसीसी पुणे

हेही वाचा -

  1. अभिनेता प्रियदर्शन जाधव याचे २५ वे नाटक, ‘हसता हा सवता’!
  2. Devbabhali Drama tour : लोकाग्रहात्सव भद्रकाली प्रॉडक्शन्स सुरु करतेय ‘देवबाभळी दिंडी – धावा जनामनाचा…!
  3. हृषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव यांचा नवा नाट्य प्रयोग, ‘छुपे रुस्तम’!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.