ETV Bharat / entertainment

फोन हिसकावून पापाराझीच्या गर्लफ्रेंडशी वरुण धवननं मारल्या गप्पा, पाहा धमाल व्हायरल व्हिडिओ - Varun dhawan - VARUN DHAWAN

Varun dhawan : गर्लफ्रेंडशी गप्पा मारणाऱ्या पापाराझीचा फोन वरुण धवननं हिसकावला आणि तिच्याशी स्वतः गप्पा मारल्या. त्याच्या या कृतीनं इतर पापाराझींना हसू आवरता आलं नाही. वरुणचा हा व्हिडिओ आता व्हायरला झाला आहे.

Varun dhawan
वरुण धवन (Varun Dhawan - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 10:54 AM IST

मुंबई- Varun dhawan : अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल नुकतेच एका बाळाचे पालक झाले आहेत. लग्नाच्या तीन वर्षानंतर बाळाच्या आगमनानं या जोडप्याच्या घरात आनंद पसरला आहे. 3 जून रोजी नताशानं एका मुलीला जन्म दिला. आतापर्यंत या जोडप्यानं आपल्या मुलीचा चेहरा आणि तिचं नाव सांगितलं नाही. दरम्यान, नुकताच वडील झालेला वरण धवन काल जिममध्ये जाताना दिसला. यावेळी त्यानं पापाराझींबरोबर असं काही केलं, ज्याची कोणी कल्पना देखील करू शकत नाही. आता सर्वत्र याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. त्याची ही कृती पाहून चाहतेही आश्चर्यचकित होताना दिसत आहेत.

पापाराझींबरोबर असं काय केलं वरुणनं : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वरुण धवननं लाल टी-शर्टबरोबर मॅचिंग शॉर्ट्स परिधान केली होती. याशिवाय त्याच्या डोक्यावर टोपी देखील आहे. जेव्हा तो जिममधून बाहेर पडला,तेव्हा पापाराझी त्याचे फोटो क्लिक करू लागले. यावेळी सर्वजण त्याला वडील झाल्याबद्दल अभिनंदन करताना दिसले. जेव्हा वरुण त्याच्या कारमध्ये बसू लागला, तेव्हा त्यानं पाहिले की एक फोटोग्राफर त्याच्या प्रेयसीशी फोनवर बोलत आहे. यानंतर त्या फोटोग्राफरचा फोन वरुण अचानक हिसकावून घेतो आणि त्या गर्लफ्रेंडबरोबर फोनवर बोलू लागतो. यानंतर वरुण म्हणतो की, 'तो सध्या व्यग्र आहे.' तसेत नंतर तेथे उपस्थित असलेले सर्व पापाराझी जोरजोरात हसू लागतात.

वर्कफ्रंट : वरुणची ही फनी स्टाइल त्याच्या चाहत्यांनाही खूप आवडली आहे. त्याच्या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करून चाहते त्याच्या स्टाइलचे कौतुक करताना दिसत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. दरम्यान, वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच 'बेबी जॉन' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात वरुण धवनबरोबर कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय तो 'स्त्री 2' चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसेल. याशिवाय तो 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटात झळकेल.

हेही वाचा :

  1. अभिनेत्री मलाबिकाच्या पार्थिवावर ममदानी ट्रस्टनं केले अंत्यसंस्कार, मृत्यूचे नेमके कारण काय? - Actress Noor Malabika Death
  2. मोस्ट अवेटेड चित्रपट "कल्की 2898 एडी"चा ट्रेलर अखेर रिलीज; प्रभास दिसतोय डॅशिंग अवतारात - Kalki 2898 AD Trailer
  3. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा 'इक्किस' चित्रपटासाठी सज्ज, केली पोस्ट शेअर - agastya nanda share pic

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.