मुंबई - Citadel Honey Bunnuy Release Date: बॉलिवूड अभिनेता वरुण धवन त्याची आगामी वेब सीरीज 'सिटाडेल हनी बनी' सध्या खूप चर्चेत आहे. ही सीरीज आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. या वेब सीरीजमध्ये साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. निर्मात्यांनी आज 25 जुलै रोजी वेब सीरीजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. राज आणि डीके यांनी इंस्टाग्रामवर 'सिटाडेल हनी बनी'च्या रिलीज तारखेचं अपडेट शेअर केली आहे. या फोटोत '01.08' असं लिहिलंय. 'सिटाडेल: हनी बनी' यावर्षी ऑगस्ट 2024 मध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. या वेब सीरीजचं शूटिंग परदेशात करण्यात आलं आहे.
वरुण आणि सामंथाचा 'सिटाडेल हनी बनी' : दरम्यान, अनेक चाहते वरुण धवनच्या या वेब सीरीजच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहात आहेत. आता शेअर केल्या गेलेल्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "मी आता ही वेब सीरीज पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही" दुसऱ्या एकानं लिहिलं, " मी ही वेब सीरीज पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे." आणखी एका चाहत्यानं लिहिलं, "या वेब सीरीजचा ट्रेलर कधी रिलीज होणार आहे." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत. या वेब सीरीजमध्ये वरुण आणि समांथा हे अॅक्शन करताना दिसणार आहे.
'सिटाडेल हनी बनी'ची स्टार कास्ट : वरुण आणि सामंथा यांच्याशिवाय या वेब सीरीजमध्ये के.के. मेनन, सिमरन, सोहम मजुमदार, शिवंकित सिंग परिहार, काशवी मजुमदार, साकिब सलीम आणि सिकंदर खेर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'सिटाडेल हनी बनी' हे प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चं वेब सीरीज भारतीय रूपांतर आहे. प्राइम व्हिडिओ इंडियानं गेल्या महिन्यात या वेब सीरीजचा ट्रेलर रिलीज केला होता. यापूर्वी सोशल मीडियावर एक क्लिप शेअर करण्यात आली होती, यामध्ये वरुण आणि सामंथा ॲक्शन करताना दिसत होते. दरम्यान वरुण धवनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं मृणाल ठाकूर एका अनटाइटल्ड चित्रपटात काम करत आहेत. दोघांनी या चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल पूर्ण केलंय. याशिवाय तो 'स्त्री 2', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'एक्कीस' आणि 'बेबी जॉन' दिसणार आहे.