ETV Bharat / entertainment

'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - कविता चौधरी

Kavita Chaudhary Passes Away : 'उडान'मध्ये कल्याणी सिंगची भूमिका साकारणारी टेलिव्हिजन अभिनेत्री कविता चौधरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अमृतसरमध्ये निधन झाले. कविता 67 वर्षांच्या होत्या.

Kavita Chaudhary Passes Away
कविता चौधरीचे निधन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 2:30 PM IST

मुंबई - Kavita Chaudhary Passes Away : टीव्ही मालिका 'उडान' आणि 'सर्फ' जाहिरातींमधील ललिताजी या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कविता चौधरी यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला. मृत अभिनेत्री कविता यांचा पुतण्या अजय सायल याने एका न्यूजवायरला या बातमीची पुष्टी केली की. दिवंगत कविता चौधरी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि गुरुवारी रात्री अमृतसर येथे वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

अजय सायलने सांगितले की काल रात्री साडेआठ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांच्यावर अमृतसर येथील पार्वतीदेवी रुग्णालयात उपचार सुरू होते अशी माहिती त्यांनी दिली.

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये कविताबरोबर शिकलेला अभिनेता अनंग देसाई याने एका पोर्टलला सांगितले की, शुक्रवारी सकाळी कविताच्या निधनाची बातमी मिळाली. अभिनेता अनंतने सांगितले की ते एनएसडीमध्ये वर्गमित्र होते आणि त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान तीन वर्षे एकत्र घालवली. त्यांनी पुढे नमूद केले की ते, कविता, सतीश कौशिक, अनुपम खेर आणि गोविंद नामदेव हे सर्व एकाच बॅचचे विद्यार्थी होते.

अनंगने सांगितले की कविता यांनी काही वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढा दिला होता, आणि त्यानंतर त्यांची भेट झाली होती परंतु त्यांनी याविषयावर फारसे बोलणं केलं नव्हतं, त्यामुळे त्यांनीही या विषयावर कधीही चर्चा केली नाही. अभिनेता अनंत देसाई म्हणाला, "ती मूळची अमृतसरची होती आणि तिथंच तिचं निधन झालं. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी, ती मुंबईत असताना मी तिच्याशी संवाद साधला होता आणि तिची तब्येत बरी नव्हती. आज सकाळी कविताच्या भाच्याने मला तिच्या मृत्यूबद्दल माहिती दिली. " अभिनेता अनंत देसाई म्हणाला.

1989 मध्ये प्रसारित झालेल्या 'उडान'मध्ये कविताने आयपीएस अधिकारी कल्याणी सिंगची भूमिका साकारली होती. त्यांनी या मालिकेत केवळ अभिनयच केला नाही तर त्याचे लेखन आणि दिग्दर्शनही केले आहे. हा शो त्यांची बहीण कांचन चौधरी भट्टाचार्य यांच्या जीवनावर आधारित होता, जी किरण बेदीनंतर दुसरी आयपीएस अधिकारी बनली होती. 1980 आणि 1990 च्या दशकातील लोकप्रिय सर्फ जाहिरातींमध्ये ललिताजींच्या भूमिकेसाठीही कविता ओळखल्या जातात.

हेही वाचा -

  1. रणवीर सिंग स्टारर 'शक्तिमान'चे कधी शूटिंग सुरू होणार? जाणून घ्या तपशील
  2. रवी किशन स्टारर कोर्टरूम ड्रामा 'मामला लीगल है'चा धमाल ट्रेलर लॉन्च
  3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासाठी संदीप सिंग सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.