ETV Bharat / entertainment

'तुम्बाड'मधील आजीचा चेहरा कसा तयार झाला? व्हिडिओ पाहून बसेल धक्का... - TUMBBAD - TUMBBAD

Tumbbad :'तुम्बाड'मधील आजीचा चेहरा कसा तयार झाला, याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणालाही घाम फुटू शकतो.

Tumbbad
'तुम्बाड' ('तुम्बाड' (Movie Poster))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 26, 2024, 6:43 PM IST

मुंबई - Tumbbad: 'तुम्बाड' पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आपल्या भयावह आणि थ्रिलर कथेनं प्रेक्षकांना प्रभावित करून पुन्हा एकदा हा चित्रपट प्रसिद्धीझोतात आला आहे. दरम्यान या चित्रपटाच्या निर्मात्यानं पडद्यामागील फुटेज त्याच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे. निर्मात्यांनी आजीच्या परिवर्तनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, जो प्रचंड भितीदायक असल्याचा दिसत आहे. आजी चित्रपटामधील भयानक पात्रांपैकी एक आहे. दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, 'भीतीची ओळख, 'तुम्बाड' ही एका रात्रीमध्ये नाही बनली, बघा 'तुम्बाड'मधील आजी कशी तयार झाली.'

आजीचं थरारक अवतार : फुटेजमध्ये आजीचे भितीदायक रूप तयार करण्यासाठी घेतलेली मेहनत दिसून आहे. परिवर्तन प्रक्रियेत प्रोस्थेटिक्सचा वापर केला जात आहे. मेकअप आणि प्रोस्थेटिक्सचा प्रत्येक थर या भयंकर व्यक्तिरेखेला जिवंत करण्यासाठी टीमचे कठोर परिश्रम आणि कौशल्य प्रतिबिंबित करते. आजीचं हे लूक खरोखरच आश्चर्यकारक आहे. विशेष म्हणजे पांडुरंगची भूमिका साकारणारा हाच अभिनेता आजीची भूमिकाही साकारत आहे. यातून त्याची अद्भुत बहुआयामी प्रतिभा दिसून येते. 'तुम्बाड' 13 सप्टेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाला. आनंद गांधी, राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद दिग्दर्शित हा 2018 चा हिंदी भाषेतील हॉरर चित्रपट आहे.

'तुम्बाड' चित्रपटाबद्दल : या चित्रपटाचे लेखन मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे आणि आनंद गांधी यांनी केलंय. या चित्रपटात सोहम शाह हा मुख्य भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटामध्ये त्यानं विनायक रावची भूमिका साकारली आहे. 'तुम्बाड'नं 64 व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये आठपैकी तीन नामांकने जिंकली. यात सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन यांचा समावेश आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून प्रशंसा मिळाली आहे. दमदार कथा उत्कृष्ट निर्मिती डिझाइन आणि आकर्षक छायांकन या चित्रपटामध्ये पाहायला मिळते. याव्यतिरिक्त, 75व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या क्रिटिक्स वीक विभागात प्रीमियर होणारा हा पहिला भारतीय चित्रपट होता. सोहम शाहशिवाय यात ज्योती मालशे आणि अनिता दाते-केळकर यांचाही विशेष भूमिका आहेत.

हेही वाचा :

  1. 'तुम्बाड' सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, रि-रिलीजमध्ये 'शोले' आणि 'टायटॅनिक'चा विक्रम मोडला - Tumbbad Box Office

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.